Satara 
सातारा

जावळीत आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह, म्हाते खुर्द व केडंबेत सीमा बंद

सकाळ वृत्तसेवा

केळघर (जि. सातारा) : म्हाते खुर्द व केडंबे (ता. जावळी) येथील तीन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात घबराट निर्माण झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने आज या दोन्ही गावांची पाहणी करून गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

केडंबे येथील 65 वर्षीय वृद्ध आपली पत्नी, मुलासह एकूण सहा जण 11 जून रोजी नवी मुंबई येथून खासगी वाहनाने प्रवास करून आले होते. यातील 55 वय असलेल्या महिलेला शुक्रवारी (ता.19) सकाळपासून श्वसन व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने केडंबे येथील आशा स्वयंसेविका आणि आरोग्यसेवक अरविंद सोमवंशी यांनी या महिलेसह पतीची तपासणी करून पुढील उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे यांनी तपासणी करून कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले होते. काल रात्री उशिरा यातील 65 वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने केडंबेसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, वैद्यकीय अधिकारी कवारे, आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, तलाठी श्री. मगरे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, आरोग्यसेवक सोमवंशी, आरोग्य सेविका रूपाली कदम, आशा, अंगणवाडी सेविकांनी बाधित रुग्णांच्या घरी भेट देऊन बाधित व्यक्ती गावातील कुणाच्या संपर्कात आले आहेत का, याची माहिती घेतली. त्यानुसार बाधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या पाच जणांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी आज पाठवण्यात येणार आहेत, तर अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या चार जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे. गावाच्या सीमा सील करण्यात आल्या असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

म्हाते खुर्द येथीलही पती, पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे दांपत्य कुटुंबासह 19 जून रोजी स्वतःच्या गाडीतून प्रवास करून आले होते. शिरवळ येथे तपासणी केंद्रावर या पती-पत्नीच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने आज गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार योगेश टोणपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन कारंडे, आरोग्य सहायक मुरलीधर पवार, यशवंत सावंत, तलाठी देशमुख, ग्रामसेवक अधिक जाधव, आरोग्य सेवक संतोष कोळपे, आरोग्य सेविका रोहिणी यादव, आशा, अंगणवाडी सेविकांनी बाधित कुटुंबाची भेट घेऊन माहिती घेतली. बाधित पती, पत्नीच्या प्रत्यक्ष संपर्कातील चार जणांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रशासनाने गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. गावात आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 


कठोर उपाययोजना करा 

जावळी तालुक्‍यात मुंबईवरून प्रवास करून आलेले कोरोनाबाधित होत असल्याने त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. मुंबईवरून प्रवास करून येणाऱ्यांना होम क्वारंटाइन केले जात असले तरी प्रशासनाने अधिक दक्ष राहून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्‍यातील स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचं' सुरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...'मी त्याचा सारखा एकदाच पण टॉप...'

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT