crime esakal
सातारा

Satara : लुटमारीनंतर दुचाकीसह एकाला टाकले कालव्‍यात

सातारा एमआयडीसीतील प्रकार; तीन अज्ञातांवर गुन्‍हा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा एमआयडीसीत असणाऱ्या महाराष्‍ट्र स्कूटर्स परिसरात लिफ्‍टच्‍या बहाण्‍याने दुचाकीस्‍वारास अडवत तिघांनी मारहाण करून त्‍याच्‍याकडील रोकड, मोबाईल हिसकावल्‍याची घटना काल सायंकाळी घडली. लूटमार करणाऱ्यांनी ऐवज लुटल्‍यानंतर दुचाकीसह स्‍वारास कालव्‍यात ढकलून देत पळ काढला. याप्रकरणी तीन अज्ञातांवर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

गोडोली येथील गोळीबार मैदान परिसरात अमोल बाळकृष्‍ण जगताप (वय ४०) हे राहण्‍यास आहेत. काल ते दुचाकीवरून महाराष्‍ट्र स्कूटर्स परिसरात गेले होते. स्कूटर कंपनीच्‍या गेटजवळ आले असतानाच त्‍यांना एकाने लिफ्‍ट मागितली. यामुळे दुचाकी थांबवत असतानाच लिफ्‍ट मागणाऱ्या व त्‍याच्‍या दोन साथीदारांनी जगताप यांना घेरले. मारहाण करत त्‍या तिघांनी जगताप यांच्‍याकडील १५० रुपयांची रोकड, १५ हजारांचा मोबाईल हिसकावला. यानंतर त्‍या तिघांनी जगताप यांची दुचाकी हिसकावली. दुचाकी हिसकावण्‍याच्‍या प्रयत्‍नास जगताप यांनी विरोध केल्‍यानंतर त्‍यांना तिघांनी मारहाण केली.

मारहाण करणाऱ्या त्‍या तिघांनी नंतर जगताप यांना, तसेच त्‍यांच्‍या दुचाकीस कालव्‍यात फेकले व पळ काढला. याची तक्रार जगताप यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून, तपास उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत. गेले काही दिवस सातारा एमआयडीसीत गुन्‍हेगारी कारवाया वाढल्‍या असून, त्‍यामध्‍ये त्‍याच परिसरातील स्‍थानिक युवकांचा सहभाग असल्‍याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या स्‍थानिक टोळीच्‍या मुसक्‍या आवळण्‍याची मागणी उद्योजक, व्‍यावसायिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT