सज्जनगडावर मशालोत्सव उत्साहात साजरा  sakal
सातारा

सातारा : सज्जनगडावर मशालोत्सव उत्साहात साजरा

शिवप्रेमींची हजेरी; शेकडो दिव्यांनी उजळला गडाचा परिसर

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे : किल्ले सज्जनगडावर आज दीपावलीची पहिली पहाट मशालोत्सवाने उजळून निघाली. या निमित्ताने शेकडो शिवभक्तांनी आज गडावर हजेरी लावली. शिवरायांच्या जयघोषात गडाचा सारा परिसर दणाणून गेला.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पहाटे चार वाजल्यापासूनच दुर्गप्रेमी सज्जनगडावर दाखल होऊ लागले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. शिवाजी महाद्वार, श्री समर्थ महाद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. सज्जनगडाचा पायरी मार्गही पणत्यांनी उजळला होता.

दुर्गप्रेमी, तसेच भाविकांनी मशालोत्सवास मोठी गर्दी केली होती. गडावरील महाद्वार, अंगलाई देवी मंदिर, पेठेतील मारुती मंदिर, श्रीधर कुटी, श्री समर्थ समाधी मंदिर अशी प्रदक्षिणा पूर्ण करून मशालोत्सव साजरा करण्यात आला.

गडाच्या परिसरात लावण्यात आलेल्या शेकडो पणत्या अन् सोबतीला शेकडो मशाली यामुळे सारा आसमंत प्रकाशमय झाला. शिवरायांची वेशभूषा केलेल्या मावळ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परळी परिसरातील शिवसमर्थ भक्त दुर्ग संवर्धक यांनी या उत्सवाचे आयोजन केले. त्याला या वेळी मोठा प्रतिसाद लाभला. येत्या काळात गड संवर्धनाचे कार्य प्रभावीपणे करून गड-किल्ल्यांचा तेजोमय इतिहास भावी पिढीपर्यंत पोचविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: शासनाची मोठी कारवाई! ‘लाडक्या बहिणी’ कायमच्या अपात्र; घेतलेले पैसेही परत द्यावे लागणार, पण कुणाला?

Sports: क्रिकेटपटू भाविका अहिरे अंडर १९ महिला संघाच्या कर्णधारपदी; दोंडाईचाचे आजोळ, नाशिकची कन्या

Nanded: कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरपले; जिद्दीने वैष्णवी बनली डॉक्टर, मेहनतीच्या जोरावर एमबीबीएस केलं पूर्ण

आमची बाळं कुठं आहेत? घरातल्या कुणाशीच चेहरा जुळेना; IVFद्वारे जुळ्या मुलींचा जन्म, DNA रिपोर्ट पाहून दाम्पत्याला धक्का

Latest Live Updates Marathi: चोपड्यात आयसर चालकावर हल्ला; गोवंश वाहतुकीचा आरोप करत गाडीची तोडफोड

SCROLL FOR NEXT