satara city 
सातारा

सातारा शहरात तीन क्षेत्रांत पूर्ण लॉकडाऊन

सकाळ वृत्तसेवा

सातारा (जि. सातारा) : कोरोनाबाधित रुग्ण बरे होणे व नव्याने रुग्ण सापडल्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सातारा शहरात तीन व तालुक्‍यात दोन असे एकूण पाच कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) नव्याने तयार केले आहेत, तर तालुक्‍यातील एक कंटेनमेंट झोन कमी केला आहे. 

सातारा शहरामध्ये शाहूनगर, शाहूपुरी व मंगळवार पेठ परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या परिसरात खबरदारी घेणे आवश्‍यक बनले आहे. त्यामुळे श्री. मुल्ला यांनी शहरात शाहूनगर, मंगळवार पेठ, शाहूपुरी असे तीन कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. शाहूनगर दत्त कॉलनी झोनच्या पूर्वेला शेजवळ घर ते संजीवनी क्‍लिनिक, पश्‍चिमेस कदम, साळुंखे घर, उत्तरेला स्वप्नांकुर घर ते शेजवळ घर, तर दक्षिणेला संजीवनी क्‍लिनिक ते श्री घर अशा चतु:सिमा आहेत. मंगळवार पेठेत होलार समाजमंदिर परिसरात झोन तयार करण्यात आला आहे. त्याच्या पूर्वेला माळी घर ते कदम घर, पश्‍चिमेस दत्त मंदिर ते लक्ष्मण आवटे घर, उत्तरेला कदम घर ते माळी घर, दक्षिणेला कदम घर ते माळी घर अशा सीमा आहेत. शाहूपुरीमध्ये निसर्ग कॉलनीमध्ये झोन तयार करण्यात आला आहे. पूर्वेस सार्वजनिक ओढा, पश्‍चिमेस चिंतामणी अपार्टमेंट, उत्तरेला सातारा- लोणंद रस्ता व दक्षिणेला संभाजी रसाळ यांचे घर अशा सीमा आहेत. 

सातारा तालुक्‍यात राजापूर व वर्ये येथे कंटेनमेंट झोन आहेत. राजपूरमध्ये पूर्वेस तात्याबा साळुंखे घर, पश्‍चिमेला सीताराम साळुंखे घर, उत्तरेला बोरणे-वावदरे रस्ता व दक्षिणेला जगन्नाथ साळुंखे घर अशा याच्या सीमा आहेत. वर्ये येथे पूर्वेस हणमंत जगताप यांचे घर, पश्‍चिमेस जुना महामार्ग, उत्तरेला एस. बी. ट्रेडर्स किराणा, तर दक्षिणेला शौकत मुलाणी अशा सीमा आहेत. या परिसरच्या हद्दी सील केल्या जाणार आहेत, तसेच तेथे अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याठिकाणी केवळ अत्यावश्‍यक सेवा घरपोच देण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे, तसेच या परिसरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करावे, असे आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे. दरम्यान, तालुक्‍यातील खडगाव येथील एका रहिवासी कोरोना बाधित आढळला होता. त्यामुळे या गावात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता. आज तेथील निर्बंध शिथिल करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT