सातारा

गुड न्यूज : कऱ्हाड तालुक्यात आजपर्यंत दाेनशे कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येची वाढ सुरूच राहिली.  साेमवारी दिवसभरात 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 845 झाली आहे. त्याचबरोबर दिवसभरात 25 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.
 
रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 20 जण पॉझिटिव्ह निघाले, तर साेमवारी रात्री आणखी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये जावळी तालुक्‍यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष, म्हाते खुर्द येथील 38 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, कऱ्हाड तालुक्‍यातील कोयना वसाहतीतील 40 वर्षीय पुरुष, तारुख येथील 20 वर्षीय दोन पुरुष व 24 वर्षीय पुरुष, पाटण येथील आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील रविवार पेठेतील तीन वर्षीय बालक, कोरेगाव (ता. फलटण) येथील 26 वर्षीय महिला, खटाव तालुक्‍यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व दोन वर्षाचे बालक, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय तरुणी, सातारा तालुक्‍यातील वडूथ येथील 63 वर्षीय पुरुष, क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय दोन महिला व 16 वर्षीय तरुण, तर कोरेगाव तालुक्‍यातील नायगाव येथील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 
साेमवारी दिवसभरात विविध ठिकाणी दाखल असलेल्या 25 जणांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील एक, कोविड केअर फलटण येथील दोन, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील आठ, बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील सहा, कोविड केअर केंद्र खावली येथील सहा, कोविड केअर केंद्र वाई येथील एक, कोविड केअर केंद्र ब्रह्मपुरी येथील एकाचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे येथील प्रयोग शाळेतून 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 248 जणांचे नमुने आज तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 

कऱ्हाडला कोरोनामुक्तीचे द्विशतक 

कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त आठ रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज मिळाला. त्यातील सहा जण कऱ्हाड तालुक्‍यातील असल्याने तालुक्‍यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्येने द्विशतक पार करत 204 चा टप्पा गाठला आहे. दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 214 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर तालुक्‍यात काल नव्याने तीन बाधित सापडल्याने रुग्णांची संख्या 244 वर पोचली आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून, 36 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या तालुक्‍यातील वडगाव-उंब्रज येथील 86 वर्षीय पुरुष, पाल येथील 55 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 51 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, केसे येथील 64 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्‍यातील उरूल येथील 26 वर्षीय पुरुष, जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष आदी रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला.

एमपीएसएसीत चमकून या विद्यार्थ्यांनी वाढविला दुष्काळी भागाचा नावलौकिक

पोलिसांची फसवणूक करणारा पुण्यात सापडला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT