tree
tree sakal
सातारा

सातारा : झाडांच्या फांद्या तोडल्याबद्दल वीज कंपनीला नोटीस

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कराड : शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या पालिकेची अथवा वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता तोडल्या आहेत. ते कृत्य करताना वीज कंपनीने वृक्षांना इजा केल्या आहेत. त्याशिवाय वृक्षांचे हेरिटेज दर्जाचेही नुकसान केले आहे. त्याचा खुलासा तीन दिवसांत न केल्यास प्रती वृक्ष एक लाखप्रमाणे शिक्षा करून वीज कंपनीवर फौजदारी खटला दाखल करण्यात येईल, अशी नोटीस पालिकेचे मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष रमाकांत डाके यांनी आज वीज कंपनीला बजावली आहे.

वीज कंपनीने काल आठ लाखांच्या थकीत वीजबिलापोटी पालिकेचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यांचे थकीत आठ लाखांपेक्षाही जास्त बिल पालिकेने अदा केले आहे. त्यानंतर दुपारी पालिकेने वीज कंपनीला विनापरवाना वृक्षांच्या फांद्या तोडल्याबद्दल नोटीस बजावली आहे. येथील दत्त चौकातील उपकार्यकारी अभियंत्यास नोटीस बजावण्यात आली आहे.

पालिकेने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की वीज कंपनीतर्फे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या छाटून त्यांना इजा पोचविली आहे. वीज कंपनीने हेरिटेज वृक्षांच्याही फांद्या तोडल्या आहेत. ते वृक्ष हेरिटेज आहेत, तरीही वीज कंपनीने शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या विनापरवाना छाटल्या आहेत. त्यामुळे नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व जतनचे उल्लंघन झाले आहे. त्यानुसार तुम्ही वृक्षांना इजा केल्यामुळे नोटीस देण्यात येत आहे. त्याचा खुलासा तीन दिवसांत कार्यालयास करावा अन्यथा प्रती वृक्ष एक लाखप्रमाणे दंडाची आकारणी करण्यात येईल. त्यासह वीज कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा लागेल, याची गंभीर नोंद घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT