सातारा

Satara: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद; नागरिकांची गैरसोय

Satara : रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.

जयंत पाटील

Karad: पावसामुळे उत्तर कोपर्डे (ता. कऱ्हाड, जि.सातारा) हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.

नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन येथील लोकांना रेल्वे पुलाखालून गावात जावे लागते. पावसामुळे सध्या पुलाखाली चिखलाचा राडारोडा झाला आहे. दरम्यान, एक मालवाहक ट्रक सकाळी याच पुलाच्या तोंडावरच चिखलात रुतला. यामुळे पुलाखालून होणारी वाहतूक बंद झाली. जवळपास सहा तास वाहतूक बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दर वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून, ठेकेदारानेही हात वर केले आहेत.

ट्रक अडकलेल्या पुलाच्या ठिकाणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावरील क्रेन, पोकलेन देण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने ट्रक बाजूला करण्यासाठी वेळ लागला. या रस्त्याचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने कायमचा सोडवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही तर नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

Kolhapur Crime : एक कोटी दे, मग बांधकाम कर; बिल्डरचं अपहरण, संशयिताने लढवलेली महापालिकेची निवडणूक

SCROLL FOR NEXT