महाबळेश्‍वरच्या विल्सन पॉईंटवर घोडसवारीवेळी दोघेजण जखमी  
सातारा

वाधवानांनंतर आता "या' धनिकाला कोणाचा वरदहस्त

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्‍वर (जि. सातारा) : राज्यात लॉकडाउन असतानाही मुंबईवरून येथे अलिशान बंगल्यांमध्ये हवापालटासाठी आलेले धनिक निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत. अशातच लॉकडाउन असताना विल्सन पॉइंटवर घोडसवारी करताना एक नऊ वर्षांचा मुलगा व घोडेवाला हे घोडयावरून पडून जखमी झाले. या प्रकरणाकडे वन विभाग व पोलिस खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उलट सुलट चर्चा शहरात सुरू आहे. 

देशात लॉकडाउन सुरू आहे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये, अशा प्रशासनाच्या सक्त सुचना आहेत. परंतु तरीही काही महाभाग येथील निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह आवरू शकत नाहीत. येथील विल्सन पॉइंटवर काही धनिकांचे बंगले आहेत. या बंगल्यात गेली अनेक दिवसांपासुन धनिकांचे कुटूंब रहात आहेत. या धनिकांच्या मुलासाठी काही दिवस घोडेसवारीची सोय करण्यात आली होती. गेली तीन ते चार दिवस दोन घोडे या मुलांच्या मनोरंजनासाठी विल्सन पॉइंर्टवर येत होती. सायंकाळी या बंगल्यातील धनिकांची लहान मुले घोड सवारीचा आनंद लुटत होती. परंतु दोन दिवसांपुर्वी घोडे मालकाने लहान मुलाला घोडयावर बसविले. तो स्वतःही त्या घोडयावर बसला. दोघांना घेवून तो घोडा भरधाव धावत होता. अलिकडेच येथे वन विभागाने डांबरीरस्ता तयार केला आहे. या डांबरावरून घोडयाचे पुढील दोन्ही पाय घसरले व घोडयावर असलेले धनिकाचा लहान मुलगा व घोडेस्वार हा गंभीर जखमी झाला. याच पॉइंटवर काही जण इव्हिनिंग वॉकसाठी आले होते. ते घटनास्थळाकडे धावले व त्यांनी दोघांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. 

येथील ग्रामीण रुग्णालयात या दोघांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले. परंतु पोलिसांना या प्रकरणाची खबर करण्यात आली की नाही या बाबत काही समजले नाही. तसेच हे प्रकरण वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एका प्रसिध्द पॉइंटवर घडल्याने वन विभागाने या प्रकरणाची दखल घेणे आवश्‍यक होते. परंतु गेली दोन दिवसात या बाबत वन विभागानेही कोणावरही कारवाई केली नाही. पोलिस विभाग व वन विभागाने घेतलेल्या भुमिकेमुळे शहरात संभ्रम वातावरण असुन या प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

Amravati Social Work : दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रांचे दान नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांची अनोखी माणुसकी

व्हायरल होण्यासाठी काहीही? भारती सिंग सांगितल्या विनोदाच्या मर्यादा, म्हणाली...‘माझी आईसुद्धा पाहणार...’

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Petrol-Diesel: कच्चे तेल महागल्याने पाकिस्तानात 'लॉकडाऊन'चा विचार! भारतात पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर काय?

SCROLL FOR NEXT