Satara Sakal
सातारा

सातारा : ट्रकला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिवराज पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीची पुढे चाललेल्या ट्रकला जोरदार धडक बसली.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : पुणे-बंगळूर (Pune-Banglore) राष्ट्रीय महामार्गावर येथील शिवराज पेट्रोलपंपाजवळ काल रात्री ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विनायक बाबूराव गोसावी (वय ४०, रा. केदारेश्वर कॉलनी, ता.कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

विनायक हे शेंद्रे येथे जेसीबी चालकाचे काम करत होते. काल रात्री दुचाकीवरून ते नातेवाईकाला सोडण्यासाठी एका लहान मुलाला घेऊन येथील मुख्य बस स्थानकात गेले होते. नातेवाईकाला सोडल्यानंतर ते लहान मुलासह दुचाकीवरून शेंद्रे येथे निघाले होते. त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. महामार्गावरील शिवराज पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीची पुढे चाललेल्या ट्रकला जोरदार धडक बसली.

त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. मोठा रक्तस्‍त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले लहान मूल किरकोळ जखमी झाले आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षांपासून ठेवले शारीरिक संबंध

Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Sangola Accident: घराच्या थोड्याच अंतरावर काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार; सांगोला-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT