उदयनराजे भोसले sakal
सातारा

Satara : साताऱ्यातील १० कोटींच्‍या कामांना मंजुरी ; उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले यांचा पाठपुरावा; १७ कामे लागणार मार्गी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहरातील प्रत्येक प्रभागात मोठी कामे होण्यासाठी एकूण १५ कोटी रुपयांची विकासकामे आम्ही स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्तावित केली होती. प्रस्‍तावित कामांपैकी १० कोटी रुपयांच्या १७ कामांना मंजुरी मिळाल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.

मंजूर कामांनुसार दौलतनगर, श्रीनाथ कॉलनी, रामकुंड, शिवमुद्रा कॉलनी, पिलेश्वरनगर येथील अंतर्गत रस्ते, खुली जागा विकसनासाठी ६५ लाख, सदरबझार परिसर, लक्ष्मी टेकडी व हद्दवाढ भागातील रस्‍ते व इतर कामांसाठी ५५ लाख, सदरबझार तसेच पिरवाडी, उत्तेकरनगर येथील रस्‍ते कामासाठी ९० लाख, देशमुख कॉलनी,

गणेश कॉलनी, सिव्हिल कॉलनी, शिक्षक कॉलनीसह परिसरातील रस्‍ते व इतर कामांसाठी ६५ लाख, करंजे येथील अंतर्गत रस्ते, तसेच ड्रेनेज व्यवस्थेसाठी ४३ लाख, प्रतापगंज पेठेतील लकेरी कॉर्नर ते देशमुख घर ते इंगवले घर, बसाप्पा पेठ, मेहेर देशमुख कॉलनीतील रस्‍त्‍यांसाठी व ड्रेनेजसाठी ९२ लाख, तामजाईनगर परिसर, आकाशवाणी,

मतकर कॉलनी, गेंडामाळ झोपडपट्टी, नालंदानगर व परिसरातील विकासकामांसाठी ९८ लाख, शाहूपुरीतील जिल्हा परिषद कॉलनीसह इतर भागातील कामांसाठी १ कोटी ३ लाख, जानकर वस्तीच्‍या रस्त्यास दुतर्फा संरक्षक भिंत बांधणे, केसकर कॉलनी, मोरे कॉलनी, महादरे येथे पाइप ड्रेन, मोरे कॉलनी येथे अंगणवाडी, महादरे येथे संरक्षक भिंतीसाठी ६५ लाखांचा निधी मिळाला आहे.

शुक्रवार पेठेतील मोती तळे सुशोभीकरणासाठी ३८ लाख, परदेशी घर ते गार्डन सिटी ते चिंचेचे झाड, सावकार कॉर्नर ते वायदंडे घर, इतर भागातील कामांसाठी ५३ लाख, निलम कॉर्नर परिसरातील कामांसाठी ४२ लाख, त्‍याचबरोबर लगतच्‍या भागातील कामांसाठी ३३ लाख, देवी कॉलनी, ठक्कर सिटी, गोडोलीसह इतर भागातील रस्‍ते व इतर कामांसाठी ४८ लाख, विलासपूर, गोळीबार मैदान परिसरातील रस्‍ते, सीसीटीव्‍ही बसविणे व इतर कामांसाठी १ कोटी १० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असेही पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT