सातारा

Satara: कराडमध्ये ठाकरे गट आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

Latest Karhad News : सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन पोलिस ठाण्यात देण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

Latest Marathi News: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे बदलापूर शाळेतील प्रकाराचा येथील दत्त चौकात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन पोलिस ठाण्यात देण्यात आले.

शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे, जिल्हा संघटिका अनिता जाधव, उपजिल्हा संघटिका कविता यादव, तालुका संघटिका सुषमा पाटील, संगीता जाधव, मलकापूर शहर संघटिका वनिता मोरे, कऱ्हाड शहर संघटिका वैशाली मोरे, दक्षिण तालुकाप्रमुख दिलीप यादव, शहर प्रमुख शशिराज करपे, उपशहर प्रमुख शेखर बर्गे, युवासेना शहर अधिकारी अक्षय गवळी, दक्षिण उप तालुका प्रमुख संभाजी जगताप, संजय चव्हाण, वाहतूक सेनेचे ज्ञानदेव भोसले, पोपट कांबळे, दशरथ धोत्रे आदींच्यातीने निवेदन देण्यात आले.

निवेदनातील माहिती अशी

बदलापुरमध्ये साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतीलच नराधमाने अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला. संबंधित नराधमाच्या विरोधात पीडित पालक गुन्हा नोंदवण्यास गेल्यावर पोलीस व प्रशासनाकडून १२ तास कोणतीही कारवाई केली नाही. संबंधितावर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. पुणे येथील शालेय विद्यार्थीनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा अशा या घटना संताप जनक आहेत. अशा नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देणे द्यावी किंवा अशा नराधमांना जनतेच्या हवाली करावे.

यातना काय असतील हे या नराधमाला कळलेच पाहिजे. म्हणजे इथून पुढे पुढची महिला तरी किंवा मुलगी अशा यातनेतून वाचू शकेल. राज्य सरकार झोपलेल आहे. गृह खात करताय काय 0 महिला सुरक्षित नसताना लाडकी बहीणीच्या खात्यात पैसे देऊन काय उपयोग. आधी महिलांना सुरक्षा द्या अश्या मागण्या पोलीस प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आल्या. यावेळी गृह खात्याचा निषेध करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT