karad
karad 
सातारा

उंडाळ्यात विद्यार्थ्यांची "सेल्फी वुईथ ट्री'

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरीत सेनेच्या वतीने व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करावे असे, आवाहन केले होते. या ऑनलाइन वृक्षारोपण महोत्सवात विद्यार्थी व पालकांनी "सेल्फी वुईथ ट्री' या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामध्ये सुमारे 250 झाडांची लागवड करण्यात आली. 

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सर्व विद्यालय बंद आहेत. त्यामुळे शिक्षण व सहशालेय उपक्रमापासून विद्यार्थी वंचित होते. त्यावर प्राचार्य बी. पी. मिरजकर, पर्यवेक्षक बी. आर. पाटील यांनी शिक्षकांची झूम ऍपद्वारे ऑनलाइन मीटिंग घेऊन इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गाचे व्हॉट्‌सअप ग्रुप करण्याचे सांगितले. त्यावर घरचा अभ्यास, ऑनलाइन व्हिडीओ, पीडीएफद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेतले जाते. दररोज सकाळी हा अभ्यास पाठविला जातो, विद्यार्थी हा अभ्यास पूर्ण करून तो शिक्षकांना पाठवितात. 

याच व्हॉट्‌सअप ग्रुपवरून राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने प्रतिवर्षीची परंपरा राखत प्रत्येक विद्यार्थ्यास आपल्या परसबागेत शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृक्षाबरोबर विद्यार्थ्यांनी आपला फोटो ग्रुपवर पाठवत. आतापर्यंत सुमारे 250 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड विद्यार्थ्यांनी केली. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT