भिलार (जि. सातारा) : समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने प्रेरित होत कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेकजण स्वयंस्फूर्तीने उतरले. अख्ख्या जगाला भयभीत करणाऱ्या या रोगाने महाबळेश्वर या गिरीस्थानालाही सोडले नाही. सुरुवातीला तालुक्यात कसलीही चिंता नव्हती. परंतु मुंबईकर चाकरमान्यांचा लोंढा गावाच्या ओढीने आला आणि आल्हाददायक वातावरणाचा तालुकाही कोरोनाच्या संकटात सापडला. पाचगणीसह काही गावांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आणि सर्वांचीच झोप उडाली.
पाचगणीकर तर नेहमीच अनेक संकटात आघाडीवर असतात. युद्ध सुरू झाल्या झाल्याच पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलचे संचालक फादर टॉमी यांनी सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये 100 खाटांचा कोरोना विलगीकरण कक्ष शासनाला उपलब्ध करुन दिला. त्यानंतर कोयना एज्युकेशन तळदेव आणि महाबळेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन निवासमध्येही विलगीकरण कक्ष उभे राहिले. तालुक्यात विलगीकरण कक्षात मुंबई- पुणेकर दाखल होऊ लागले. तसतसे पाचगणी व महाबळेश्वरमधील सर्व डॉक्टर एकवटले आणि त्यातून सुरु झाली कोरोनाविरुद्धची लढाई.
पाचगणीतील डॉ. अभय देशपांडे यांनी नियोजन केले. सर्व आरोग्य योद्ध्यांना आवाहन केले आणि एक एक म्हणत सर्वजण एकत्र आले. सेवा सुरू झाली. डॉ अभय देशपांडे, डॉ. आशिष चोपडे, डॉ. शीतल दाभोळे, डॉ. सुहास जंगम, डॉ. विशाल पारठे, डॉ. किरण कदम, डॉ. सलीम मानकर, डॉ. नदीम डोंगरे, डॉ. अब्दुल मानकर, डॉ. विराज, डॉ. महेंद्र भिलारे, डॉ. किरण बावळेकर, डॉ. महेश भिलारे, डॉ. अरबाज डांगे, डॉ. अरुण भिलारे, डॉ. अभिषेक दगडे, डॉ. अजित प्रभाळे, डॉ. निदा बागवान, डॉ. फातिमा शेख, डॉ. किरण सालपे, डॉ. प्रतीक्षा मुंगसे, डॉ. शेटे, डॉ. आशिष सावरकर, डॉ. अरुणा रसाळ ही सारी टीम कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज झाली.
सुरुवातीला तालुक्यात रुग्ण नसल्याने सुरळीत होते. परंतु जसजसे बाधित रुग्ण वाढले आणि जिल्हा प्रशासनाने वाई, महाबळेश्वर, खंडाळा व जावळी तालुक्यांसाठी पाचगणीतील बेल एअरमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होकार दिला तसे या डॉक्टर योद्ध्यांची जबाबदारी वाढली. पण न डगमगता कोरोनाचा सामना करत सुरुवातीला तीन डॉक्टरांची टीम अहोरात्र या कोरोना बाधितांवर उपचार करू लागली. सात दिवस ही टीम दवाखान्यात राहून सेवा देते. नंतर सात दिवसानंतर दुसरी टीम रुजू होणार व पहिली टीम सात दिवस कॉरंटाईन होणार अशा पद्धतीने सुनियोजन झाले. त्यास महाबळेश्वर आरोग्य विभाग, पालिका, पोलीस प्रशासन, बेल एअर प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.
सध्या पाचगणीच्या केअर सेंटरमध्ये 60 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. काहींना डिस्चार्ज मिळाला आहे. डॉ.अभय देशपांडे, डॉ.आशिष चोपडे, डॉ.शितल दाभोळे यांचा सात दिवसांच्या रुग्ण सेवेचा कालावधी काल पूर्ण झाला आणि या सर्वांना पाचगणीकरांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत पुष्पवर्षाव करून आभार मानले.
अबब!...सातारा जिल्ह्यात आढळले 40 किलाेचे अजगर; प्राणिमित्रांनी वाचवला जीव
कोरोनाने जगाला हादरवले असताना महाबळेश्वर तालुका कसा सुटेल. तालुक्यात होऊ घातलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची संधी आम्हाला लाभली आहे. आपल्या लोकांची सेवा करण्याचं भाग्य मिळणं म्हणजे एक आव्हान आणि अभ्यासही आहे.
डॉ. किरण सालपे, पाचगणी.
आपण आपल्या समाजाचे काहीतरी देण लागतो, या निस्सीम भावनने आम्ही सर्वजण एकवटलो आहोत. कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत.
डॉ अभय देशपांडे, पाचगणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.