satara esakal
सातारा

सातारा : अस्‍वच्‍छ सातारा असुंदर सातारा

दुभाजकांमध्‍ये व्‍यापारी पेठांतील कचरा; पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांवर उभारलेल्‍या दुभाजकांमध्‍ये परिसरातील व्‍यापाऱ्यांकडून कचरा टाकण्‍यात येत आहे. या कचराफेकीमुळे दुभाजकांना कचरा कुंडीचे स्‍वरूप आले आहे. दुभाजकांमध्‍ये कचऱ्याचे ढीग साचल्‍याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. व्‍यापारी, पथारीवाल्‍यांच्‍या कचराफेकीकडे पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाचे दुर्लक्ष असून यामुळे ‘अस्‍वच्‍छ सातारा...असुंदर सातारा’ अशी शहराची कुप्रसिध्‍दी होऊ लागली आहे.

सातारा शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यांच्‍या रुंदीकरणानंतर पालिकेने त्‍याठिकाणी दुभाजक तयार केले. या दुभाजकामंध्‍ये पालिकेच्‍या वतीने वृक्षारोपण करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या देखभालीसाठी खासगी ठेकेदाराची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दुभाजक आणि लावलेल्‍या शोभीवंत झाडांमुळे शहराच्‍या सौंदर्यात भर पडली होती. या दुभाजकांना पालिकेच्‍या दुर्लक्षामुळे तसेच परिसरातील व्‍यापाऱ्यांच्‍या मनमानीमुळे सध्‍या अवकळा प्राप्‍त झाली आहे. सातारा तहसीलदार कार्यालय ते मध्‍यवर्ती बस स्‍थानक या मुख्‍य रस्‍त्‍यावरील दुभाजकाची महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेच्‍या काळात रंगरंगोटी करण्‍यात आली होती.

याच दुभाजकामध्‍ये नंतरच्‍या काळात परिसरातील व्‍यापारी, पदपथ विक्रेते, पथारीवाल्‍यांनी कचरा फेकण्‍यास सुरुवात केली आहे. या फेकलेल्‍या कचऱ्याचे ढीग त्‍याठिकाणी साचले असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुकानात तयार होणारा प्‍लॅ‍स्‍टिकच्‍या पिशव्‍यांत साठवून फेकण्‍यात येत असल्‍याने याठिकाणी भटक्‍या कुत्र्यांच्या झुंडीचादेखील वावर सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT