Satara 
सातारा

युरियावर अन्य खत मारले जाते माथी!, कृषी सेवा केंद्र बदलले, की बदलतो भाव

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांतून युरियाची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन हे खत हवे असेल, तर दुसरे खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. युरियाच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची सरसकट लूट केली जात आहे. विशेष म्हणजे कृषी सेवा केंद्र बदलले, की भावही बदलत आहे. 

तालुक्‍यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याने शेतशिवार गजबजून गेलेली आहेत. मागील कित्येक दिवसांपासून बाजरी, मका अशा इतर पिकांना युरियाची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे; परंतु मागणीच्या तुलनेत शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा होत नसल्याने तालुक्‍याच्या विविध भागांत तुटवडा भासतो आहे. त्यात युरिया खताची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रारंभी युरिया नसल्याचे कृषी सेवा केंद्रांकडून सांगण्यात येते.

मात्र, युरिया खत पाहिजे असेल, तर पोटॅश, पॅमेशिअम आणि तणनाशके घेण्याचा आग्रह करण्यात येत आहे. त्यामुळे गरज नसताना शेतकऱ्यांना युरियासोबत नकोसे असलेली खते घ्यावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे कृषी विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, तसेच आधारकार्डवर एक ते दोन गोणी मिळत आहेत. दुकानदार अधिकाऱ्यांना सांगत आहेत, की आमच्या कायमच्या ग्राहकांनाच युरिया देणार आहोत. 
मग इतरांनी करायचे काय? 

दरफलकही गायब... 

कोणत्या बियाणाची किती किंमत आहे. कृषी केंद्रामध्ये औषधे, बियाणे, खते यांचा किती साठा आहे याची माहिती देणारे फलक कृषी केंद्रांत दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे; पण बोटावर मोजता येतील एवढ्याच दुकानांत फलक आहेत. बाकी सर्वच केंद्रांतील फलक गायब झालेल आहेत. त्यामुळे बियाणांचे, खताचे दर माहीत नसल्याने खिशाला झळ बसत आहे. दर नसणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे गरजेचे आहे. 

कृषी विभागास हवी लेखी तक्रार... 

मी व माझ्याबरोबर असलेल्या शेतकऱ्यांनी म्हसवड येथील एका कृषी सेवा केंद्रामध्ये युरियाचा साठा असूनही युरिया दिला जात नसल्याची तक्रार आणि साठा असल्याचा व्हिडिओ विभागास दिलेला होता. त्यानंतर संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी यांनी त्या दुकानावर धाड मारून स्टॉक सील केला; पण काही तासांतच स्टॉक रिलीज केल्याचे सांगितले. त्यावर लेखी तक्रार नसल्याचे कारण सांगण्यात आले. कोरोना परिस्थितीमुळे आणि बस सुरू नसल्याने शेतकरी दहिवडीस जाऊ शकत नसल्यामुळे लेखी तक्रार देता येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हास्तरावरून चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी किरण खळवे यांनी केली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी आजपासून; एकूण ४६२ जागा

Jewellery Shop Robbery : 'त्या' विसरलेल्या मोबाईलमुळे झाला दरोड्याचा उलगडा; राजस्थानमधील पाच दरोडेखोर अलगद जाळ्यात, बंगळुरातील सराफी दुकानातील घटना

Valentine's Day Trip: निसर्गप्रेमी जोडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन! पुण्याजवळच्या ‘या’ ठिकाणी साजरा करा व्हॅलेंटाईन डे

Inspirational Story: दगड रचणाऱ्या वडिलांचे स्वप्न झालं सोनं! संकेत मोहितेला जपानमध्ये २० लाखांचे पॅकेज, मेहनतीच्या जाेरावर कंपनीत नाेकरी!

P Velarasu : औद्योगिक विकासासाठी १० हजार एकरांचे संपादन करणार

SCROLL FOR NEXT