Vegetables esakal
सातारा

सातारा : भाजीपाला पीक नुकसानीच्या फेऱ्यात; पावसाने वाढवली चिंता

शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या भाजीपाला-पालेभाज्यांच्या पिकांना फटका बसणार आहे

जालिंदर सत्रे

कऱ्हाड/पाटण : वातावरणातील बदलामुळे पावसाची सातत्याने हजेरी लागत आहे. त्यामुळे शेतातील कामे रखडली होती. दोन दिवसांपासून अधून-मधून त्याचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या भाजीपाला-पालेभाज्यांच्या पिकांना फटका बसणार आहे. रब्बी हंगामातील पिकांवर व ऊस लागणी व तोडणीवर त्याचा परिणाम होणार आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पाऊस नोव्हेंबर महिन्यात आठ दिवस कमी-अधिक प्रमाणात पडला. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा या पिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. खरीप हंगामातील रखडलेली काढणी मिळालेल्या उघडिपीत पूर्णत्वाकडे गेली असली तरी नोव्हेंबरमधील पडलेल्या पावसामुळे रखडलेल्या उसाच्या लागणी आज पडलेल्या पावसामुळे पुढे ढकलणार आहेत.

पुन्हा पाठीमागे आठ दिवस पडलेल्या पावसामुळे लागणीसाठीची पूर्वमशागतीची व तयार झालेल्या शेतात उसाची लागण करण्याची कामे खोळंबली आहेत. गेली आठ दिवस पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे उसाच्या लागणीस वेग आला असता. मात्र, पुन्हा पाऊस पडू लागला असल्याने व्यत्यय आला आहे. भाताच्या काढणीनंतर तालुक्याच्या पश्चिम भागातील विशेषत: जिराईत विभागातील शेतकरी जानेवारी ते जुलैपर्यंत जनावरांना लागणाऱ्या सुक्या चाऱ्यासाठी डोंगर उतारावरील गवत कापणीच्या कामाला लागतो.

मात्र, गेले १५ दिवस ढगाळ वातावरण व पडणारा पाऊस यामुळे गवत कापणीला सुरुवात केलेली नाही. पाऊस असाच काही दिवस पडत राहिला तर हे गवतही कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून अधून-मधून त्याचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या भाजीपाला-पालेभाज्यांच्या पिकांना फटका बसणार आहे. रब्बी हंगामातील पिकांवर व ऊस लागणीवर त्याचा परिणाम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT