सातारा

उदयनराजेंच्या मौनामुळे उत्सुकता ताणली; धक्कातंत्राचा होणार वापर!

गिरीश चव्हाण

सातारा : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीत खांदेपालट सुरू आहे. या खांदेपालटासाठीचे वातावरण उपाध्यक्ष किशोर शिंदे आणि स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या राजीनाम्याने तयार झाले आहे. वातावरण तयार असले तरी नवनियुक्‍त्यांबाबतचे कोणतेही सूचक वक्‍तव्य आघाडीचे सर्वेसर्वा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेले नाही. उदयनराजेंच्या मौनामुळे सातारकरांची उत्सुकता ताणली गेली असून, ते आपला कौल कोणाच्या बाजूने देणार, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

पालिकेत सातारा विकास आघाडीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आघाडीने वेळोवेळी अनेक राजकीय ठोकताळे मांडत त्यानुसार सभागृहातील विरोधकांची कोंडी केली आहे. साताऱ्याबरोबर आजूबाजूच्या परिसरावरसुध्दा गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यातच पालिकेची हद्दवाढ झाली आणि शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द, शाहूनगर व इतर त्रिशंकू भाग साताऱ्यात सहभागी झाला. हद्दवाढीमुळे त्याठिकाणच्या ग्रामपंचायती तसेच पंचायत समितीचे गण रद्द झाले. नव्याने सहभागी झालेल्या भागात लोकसंख्येच्या प्रमाणात 12 नगरसेवक वाढणार आहेत. 

सातारा शहर आणि नव्याने सहभागी झालेल्या भागात आपल्या विचारांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत, यासाठीची रणनीती "साविआ' ठरवत आहे. साविआच्या रणनीतीचा आढावा घेत नगर विकास आघाडीसुध्दा सक्रिय होत आहे. दोन आघाड्या सक्रिय होत असल्यातरी जनमताची चाचपणी करत अजून तरी भाजपचे "कदमताल' सुरू आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेली पालिकेची निवडणूक पुन्हा एकदा एकहाती जिंकण्याची तयारी "साविआ'ने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेतील पदाधिकाऱ्यांना पायउतार करण्यात आले. 

श्री. शिंदे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी मनोज शेंडे यांची वर्णी लागणार असल्याचे "साविआ'चे पदाधिकारी सांगत आहेत. पदाधिकारी सांगत असले तरी त्याबाबतचे कोणतेही सूचक वक्‍त्व्य उदयनराजेंनी केलेले नाही. उपाध्यक्षपदाच्या निवडीबरोबरच स्वीकृत नगरसेवक निवडीबाबतसुध्दा उदयनराजेंनी मौन धारण केले आहे. स्वीकृत नगरसेवकपदावर काम करण्यासाठी अनेक इच्छुकांनी उदयनराजेंना साकडे घातले आहे. धक्कातंत्रात माहिर असलेले उदयनराजे आगामी काळात कोणाला पालिकेत काम करण्याची संधी देणार, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT