karad 
सातारा

गावे 111; बंदोबस्तासाठी फक्त 50 पोलिस

संताेष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) ः उंब्रज पोलिस ठाण्यांतर्गत 111 गावे असून जवळपास तीन लाख लोकसंख्या आहे. कऱ्हाड आणि पाटण तालुक्‍यांत हद्दीचा विस्तार आहे. या पोलिस ठाण्यास एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि 50 कर्मचाऱ्यांवरच काम करावे लागत आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 

तालुक्‍यातील सर्वांत मोठे पोलिस ठाणे म्हणून उंब्रज पोलिस ठाण्याचा समावेश होतो. या पोलिस ठाण्यांतर्गत 111 गावे येतात. या ठाण्याचे कामकाज केवळ 50 कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामध्ये 40 पुरुष, 10 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. त्यातील चार कर्मचारी हे कऱ्हाडात असून दोन कर्मचारी रजेवर आहेत. पोलिस ठाण्यांतर्गत मसूर, तारळे, चाफळ या तीन ठिकाणी आउट पोस्ट आहेत. तारळे व मसूरला पोलिस उपनिरीक्षक अधिकाऱ्याची नेमणूक आहे, तर चाफळ हे दूरक्षेत्र हे कर्मचारीच चालवत आहेत. पाल दूरक्षेत्रास मंजुरी असूनही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे दूरक्षेत्र सुरू होऊ शकले नाही. 

या पोलिस ठाण्याचा विस्तार पाहाता येथील क्राईम रेट संख्या 400 ते 500 एवढी आहे. या पोलिस ठाण्यास 10 किलोमीटर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग येतो. या महामार्गावर वारंवार अपघात व इतर घटनांसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नेमावा लागतो. एवढा क्राईम रेट पाहता पोलिस ठाण्यास जादा कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असून केवळ 50 कर्मचाऱ्यांवर कामकाज चालवावे लागत आहे. या पोलिस ठाण्याअंतर्गत पाल देवस्थान आणि चाफळ देवस्थान ही दोन मोठी देवस्थाने येतात. तारळी धरण व चाफळ येथील उत्तर मांड धरण अशी दोन धरणे आहेत. सध्या जिल्ह्यात एक कॅबिनेट मंत्री, तर दुसरे राज्यमंत्री आहेत. या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळेही उंब्रज पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्तासाठी कर्मचारी तैनात करावे लागतात. सध्या 55 कर्मचारी संख्या मंजूर असून 50 कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे पोलिसांना कंन्टेनमेंट झोनच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी नेमावा लागत आहे. त्यामुळेही कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. 


पोलिस ठाण्याची हद्द व व्याप्ती पाहता 80 ते 90 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. याबाबत वरिष्ठांकडे मागणी केली असून पाठपुरावा सुरू आहे. 

- अजय गोरड, सहायक पोलिस निरीक्षक, उंब्रज 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT