Firing in Wai Court 
सातारा

Firing in front of Judge: भर कोर्टात न्यायाधीशांसमोरच आरोपीवर गोळीबार! साताऱ्यात घडला थरार

यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वाई : साताऱ्यातील वाई इथं भर कोर्टात न्यायाधीशांच्या दालनातच एका आरोपीवर गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Satara Wai News Bullet Fire in front of Judge FIR registered on 15 People)

सुत्रांच्या माहितीनुसार, वाई न्यायालय हा गोळीबार झाला असून मोक्काखाली कारवाई करण्यात आलेला कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) याच्यासह निखिल व अभिजीत शिवाजी मोरे (रा गंगापुरी वाई) यांच्यावर गोळीबार झाला आहे. कोर्टात दबा धरुन बसलेल्या एका आरोपीनं हा गोळीबार केला आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, बंटी जाधव हा कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात असताना त्यानं वाईमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाकडं खंडणीची मागितली होती. यामुळं वाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी कळंबा कारागृहातून तीन जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

तसेच त्यांना आज वाई कोर्टात आणल्यानंतर कोर्टात दबा धरुन बसलेल्या एका आरोपीनं बंटी जाधवसह निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे या तिघांवर गोळीबार केला. (Latest Marathi News)

या आरोपींवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. या थरारक घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार न्यायाधीशांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोरच घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी पोलिसांच्या हवाल्यानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला अधिकारी नको, मंत्र्यानं डावललं; IAS मनिषा म्हैसकर यांचा महायुतीच्या मंत्र्याबाबत गौप्यस्फोट

Savitribai Phule: सावित्रीमाई अन् ज्योतिबांच्या विचारांचा पाया; खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उलगडला विचारांच्या प्रभावाचा प्रवास

Mulank Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक असतात हेराफेरीत एक्स्पर्ट! कमी वयात कमावतात बक्कळ पैसा, गोड बोलून शत्रूचेही मन जिंकतात

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या पुसदमध्ये धार्मिक स्थळांवरील विनापरवाना भोंगे स्वेच्छेने काढले

Pune Crime: पुण्यात खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलासोबत भयानक कृत्य... प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले, ऑफिस बॉयला अटक

SCROLL FOR NEXT