Water Reduction esakal
सातारा

Water Reduction : सातारकरांवर पाणीकपातीचे संकट

पावसाचे आगमन लांबल्‍यास पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सातारा पालिकेने कास आणि शहापूर योजनेतून होणाऱ्या शहरात पाणीकपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पावसाचे आगमन लांबल्‍यास पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सातारा पालिकेने कास आणि शहापूर योजनेतून होणाऱ्या शहरात पाणीकपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सातारा - पावसाचे आगमन लांबल्‍यास पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सातारा पालिकेने कास आणि शहापूर योजनेतून होणाऱ्या शहरात पाणीकपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय येत्‍या गुरुवारपासून लागू होणार आहे. पाणीकपातीच्‍या वेळापत्रकानुसार प्रत्‍येक पेठेतील पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.

या वेळापत्रकानुसार कास योजनेतील पाणी पुरवठ्यात सोमवारी-शुक्रवार पेठ, गडकर आळी, शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेववाडी येथील, बुधवारी- मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा, ढोणे कॉलनी, गुरुवारी- भटजी महाराज मठ, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्‍हटकर आळी, नागाचा पार, शुक्रवारी- संत कबीर सोसायटी, पोळ वस्‍ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा, गारेचा गणपती, मनामती चौक, पद्मावती मंदिर, होलार समाज मंदिर, ठक्कर कॉलनी, बोगदा, समर्थ मंदिर परिसर, धस कॉलनी, दस्‍तगीर कॉलनी, शनिवार- व्‍यंकटपुरा, धनिणीची बाग, कारंडबी नाका, पोळ वस्‍ती, पॉवर हाउस, रविवार- अदालत वाडा, माची पेठ, बोगदा परिसर, बालाजीनगर, कांबळे वस्‍ती, जांभळेवाडा, जंगीवाडा, गोल मारुती परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शहापूर योजनेवर आधारित असणाऱ्या भागातील सोमवार- तांदूळ आळी, मोती चौक, देवी चौक, लक्ष्‍मी हॉटेल, गोरक्षण बोळ, शनी मारुती मंदिराचा मागील भाग, मोती चौक ते ५०१ पाटी परिसर, औंधकर मळा, मोती चौक, राधिका टॉकीज परिसर, मंगळवार- समर्थ मंदिर चौक ते हत्तीखाना, सोमवार पेठ, बागवान गल्‍ली, दैवज्ञ मंगल कार्यालय, न्‍यू इंग्‍लिश स्कूल चौक, जानकीबाई झंवर शाळा परिसर, खडेश्‍‍वर शाळा, कूपर कारखाना, पिसाळ आर्केड, शाहू गार्डनची मागील बाजू, घोरपडे कॉलनी, केसरकर पेठ, जुना दवाखाना येथील काही भाग, शिर्के शाळा, कमानी हौदाची मागील बाजू व इतर भाग, बुधवार- कुंभारवाडा, कोल्‍हाटी वस्‍ती, चारभिंत टाकी ते कूपर कारखाना परिसर, गुरुवार- राजलक्ष्‍मी टॉकीजची मागील बाजू, शेटे चौक, नालबंद वाडा, खड्डा मशीद, कोतवाल वाडा, औंधकर घर, राजसपुरा,दुर्गा पेठ, शुक्रवार - टोपे मामा दत्त मंदिर, घोरपडे कॉलनी, काकडे बोळ, जुना दवाखाना परिसर, शनिवार- मल्‍हार पेठ, बडेकर वस्‍ती, ढोर गल्‍ली, नकाशपुरा, शनिवार पेठ, भवानी शाळा, रविवार पेठ, लोणार गल्‍ली, पंताचा गोट, खंडोबाचा माळ, रविवार -समर्थ मंदिर परिसर, विश्‍‍वेश्‍‍वर मंदिर परिसर, स्‍टेट बँक कॉलनी, मंगळवार पेठ, करंजे, शेंडे कॉलनी, निसर्ग, एकता कॉलनी, बुधवार नाका भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT