Satara 
सातारा

जिल्ह्यातील "या' गावाची "कोरोना हॉटस्पॉट'कडे वाटचाल, रात्रीत आढळले 17 बाधित

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील रामवाडी, पुनवडी, सायगावपाठोपाठ आता दुदुस्करवाडी कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ लागले आहे. काल रात्री आलेल्या अहवालानुसार तब्बल 17 बाधित आढळले असून, एकूण संख्या 19 झाली आहे. त्यातील एकाचा व सायगावमधील एकाचा मृत्यू झाल्यामुळे गावात व परिसरात खळबळ उडाली आहे. आता जास्तीत जास्त घेतलेली काळजी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली. 

24 जुलै रोजी आढळलेल्या कोरोनाबाधित दोन व्यक्तींच्या संपर्कातील निकटवर्तीय 28 लोकांपैकी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दीड वर्षाच्या लहान बालकासह विविध वयोगटातील पुरुष आणि महिला मिळून 18 जणांचा समावेश आहे. अचानक वाढलेल्या बाधितांच्या संख्येमुळे प्रशासनासह आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले असून, ग्रामस्तरीय समिती व आरोग्य विभागाच्या वतीने आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांच्या टीम तयार करून डॉ. दिलीप वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जावून तपासणी करण्यात येत आहे. गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून गाव सील केले आहे.

गावात दोन्ही बाजूने येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर 75 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता येथील साखळी खंडित करण्याचे आव्हान प्रशासन व आरोग्य विभागासमोर असल्याने कोणीही ग्रामस्थांनी घाबरून न जाता कुणाला काही तब्येतीच्या तक्रारी असल्यास लगेच कळवावे, असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे. निकटवर्तीय 55 हायरिस्क लोकांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, तर 13 लोकांना लोरिस्क म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामसेवक एस. बी. गायकवाड, एस. पी. जाधव, तलाठी अमोल पाटील, सरपंच अजित दुदुस्कर, पोलिस पाटील, सुहास भोसले, आशा स्वयंसेविका लक्ष्मी दुदुस्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक आर. एन. धुमाळ, एस. एम. साळुंखे, पी. एल. माहुरे यांची उपस्थिती होती. 


संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT