karad 
सातारा

शब्बास..! अखेर "हे' गाव झाले कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

विंग ः गाव कोरोनामुक्त झाले आहे. मात्र, गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी बाधित गावांतील लोकांना येथे प्रतिबंध करा, त्यांना रोखा, असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. कोरोना ग्रामस्तरीय समितीचे त्यांनी विशेष कौतुक केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार वाकडे व गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी येथे अचानक भेट दिली. बैठक घेऊन आढावा घेतला. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. आवश्‍यक सूचना केल्या. गाव मोठे आहे. लोकसंख्या मोठी असतानाही गाव कोरोनामुक्त केले आहे, हे तुमचे यश आहे. प्रशासनाला मोठे सहकार्य मिळाले. विशेषतः कोरोना ग्रामस्तरीय समिती सदस्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. समिती सदस्यांनी अन्य बाधित गावांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्री. वाकडे यांनी केले. 

कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत सातारा जिल्हा बॅंक अधिकारी मीनल भोसले, सिंडिकेट बॅंक व्यवस्थापक लिशा छाबडा यांनी माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सरपंच धनाजी पाटील, सदस्य भागवत कणसे, निळकंठ खबाले, पोलिस पाटील रमेश खबाले, मंडलाधिकारी डी. सी. दीक्षित, ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे, तलाठी गणेश तडाखे, बापूराव खबाले, अशोक यादव, शंकर खबाले, जयवंत पाटील यांनी मुद्दे उपस्थित केले. ग्रामसेवक श्री. रोंगटे यांनी प्रास्ताविक केले. बाबूराव खबाले यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Ganesh Procession : साउंड सिस्टीमच्या ट्रॅक्टर मालकास; एक वर्ष कारावासासह ३० हजारांचा दंड

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

SCROLL FOR NEXT