khatav 
सातारा

शाब्बास..! बॅंड वादकाची अशीही जिद्द

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : कोरोना संसर्गाच्या साथीत वाद्यवृंद संचाचा व्यवसाय कोंडीत सापडल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाकेश्वर (ता. खटाव) येथील वाद्यवृंद संच चालकाला बिगाऱ्याचे काम करावे लागत आहे. साहेबराव बाबूराव केंगार असे या वाद्यवृंद कलाकाराचे नाव आहे. 

केंगार कुटुंबीयांचा सनई वादनाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांचे वडील (कै.) बाबूराव केंगार हे सनईबरोबर ढोल, ताशा वाजविण्यात पारंगत होते. गावातील धोंडीराम बंडू साठे यांच्या जयहिंद ब्रॉस बॅंड कंपनीत ते काम करीत होते. त्यामुळे लहानपणापासूनच साहेबराव यांनाही वाद्यकामाचा छंद जडला. नववीपर्यंत शाळा झाल्यानंतर त्यांनी ढोल वादन सुरू केले. कमी वयातच त्यांनी सिद्धेश्वर कुरोली, खटाव, कातरखटाव, वडूज येथील बॅंड वादन कंपनीत वादन केले. 

सध्या ते डाळमोडी (वडूज) येथील रेणुका ब्रास बॅंडमध्ये काम करीत आहेत. या कामाकरिता प्रत्येक वर्षी एप्रिल, मे या दोन महिन्यांकरिता 40 ते 50 हजार रुपये मिळतात. इतर वेळी काम आले तर रोजंदारीप्रमाणे पैसे मिळतात. पाच वर्षांपूर्वी त्यांनी वाकेश्वर येथे स्वत:ची न्यू भैरवनाथ बॅंड पार्टी काढली. मात्र, वाढीव भांडवल व चांगल्या कलाकारांची वाणवा असल्याने त्यांना स्वत:ची बॅंड कंपनी गुंडाळावी लागली. त्यानंतर ते पुन्हा रेणुका बॅंड कंपनीत कामाला लागले. या परिस्थितीत स्वत:चा संसाराचा गाढा हाकत दोन मुलांचे शिक्षण करतानाच कोरोनाने लॉकडाउनचा घाला घातल्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे त्यांना नाइलाजाने गावात गवंडी काम करणाऱ्यांकडे बिगारी म्हणून काम करावे लागत आहे. 


चांगल्या काळात आपण उत्कृष्ट ढोल वादक, बॅंड मास्तर म्हणून काम केले. मात्र, आता परिस्थिती वाईट आहे. अशा स्थितीत खचून न जाता पोटासाठी काही तरी उद्योग केला पाहिजे, शिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील करायचा आहे म्हणून बिगारी काम करण्याचा निर्णय घेतला. 

- साहेबराव केंगार, वादक, वाकेश्‍वर 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs UAE U19 : भारताच्या ४३३ धावा! वैभव सूर्यवंशीच्या १७१ धावा U-19 रेकॉर्ड बूकमध्ये नोंदवल्या जाणार नाहीत; जाणून घ्या कारण

"तर माझं संपूर्ण कुटूंब आंदोलनात उतरेल" मराठी भाषेच्या प्रश्नावर सुमित राघवन झाला व्यक्त ; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

Ladki Bahin Yojana: ई-केवायसीला मुदतवाढ; अडचणी कायम, ‘लाडकी बहीण’ला सर्व्हर डाऊनचा अडथळा

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये 'एक नंबर'ची लढाई! नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध शिंदेसेनेचा ‘स्ट्रेट फाइट’

SCROLL FOR NEXT