khatav 
सातारा

प्रतिबंधात्मक क्षेत्राचे निकष वेगवेगळे का?

आयाज मुल्ला

वडूज : कोरोनाबाधित रुग्णाचा काही काळ वावर झाल्यानंतर शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्राची व्याप्ती कमीत कमी करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले. 

शहरातील व्यापाऱ्यांनी डॉ. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. गेल्या सहा दिवसांपूर्वी ठाणे येथून आलेला रुग्ण काही काळ शहरात आला होता. त्यामुळे बस स्थानक केंद्र मानून परिसरातील दहिवडी-कऱ्हाड रस्त्यावरील हुतात्मा परशुराम विद्यालय, पेट्रोल पंप, पुसेगाव रस्त्यावरील बॅंक ऑफ इंडिया, वाकेश्वर रस्त्यावरील जुने विश्रामगृह हा परिसर प्रबिंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी असे रुग्ण आढळल्यास 100 मीटर क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. मात्र, येथे 500 मीटरचा अट्टाहास का? असा सवाल यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. 

प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आवारात राष्ट्रीयीकृत बॅंका, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती ही कार्यालये सुरू आहेत. मग व्यापाऱ्यांवरच अन्याय का? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य मार्ग काढून प्रतिबंधात्मक क्षेत्राची व्याप्ती कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरी भागात रुग्ण सापडल्यास सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले जाईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election Candidates List : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; पक्षनिहाय उमेदवारांची यादी आली समोर, सर्वाधिक भाजपला संधी

India Census 2026 : राज्यात आजपासून जनगणनेला सुरूवात! घरबसल्या स्वतःच भरा ऑनलाईन माहिती; 'स्व-गणना' करण्याची काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

श्रीलंकेच्या दोन क्रिकेटपटूंना अटक! हॉटेलच्या बाथरुममध्ये व्हिडिओ काढल्याचा महिलांचा आरोप

Eknath Shinde Meeting NCP Leader : अमोल मिटकरीनंतर राष्ट्रवादीतील दुसरा नेता नाराज, थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT