सातारा : महाबळेश्वर पालिकेच्या सभा रद्द का होत आहेत sakal
सातारा

सातारा : महाबळेश्वर पालिकेच्या सभा रद्द का होत आहेत?

उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर : स्वतःला कायदे पंडित समजता मग पालिकेच्या सर्वसाधारण सभा का रद्द होत आहेत, असा सवाल करून नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेवक कुमार शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

नगराध्यक्षा शिंदे यांनी १०१ विषयांवर चर्चा करण्यासाठी काल पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा आयोजिली होती. राज्य शासनाने कोरोनाबाबतचे सर्व नियम शिथिल करून सर्व प्रकारच्या सभा आता ऑनलाइन न घेता ऑफलाइन घेण्याची सूचना केली होती. ही सूचना डावलून नगराध्यक्षांनी मनमानी कारभार करीत सर्वसाधारण सभा ऑनलाइन आयोजित केली.

या विरोधात पालिकेतील १७ पैकी १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याची जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेऊन पालिकेला नगरविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सभेचे आयोजन करण्यात यावी, असे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नगराध्यक्षा शिंदे यांनी आजची सर्वसाधारण सभाही रद्द केली. विशेष म्हणजे यापूर्वीच्या दोन सभाही वेगवेगळ्या कारणाने रद्द झाल्या होत्या. त्या संदर्भात उपनगराध्यक्ष सुतार यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षा व त्यांचे नगरसेवक पती यांच्यावर टीका केली.

पालिका कार्यालयाच्या इमारतीमधील लोखंड, पत्रे व फर्निचर कोठे आहे, बस स्थानकाच्या भिंतीला लावलेले पत्रे कुठे आहेत, कचरा डेपोचे नूतनीकरणासाठी केलेला खर्च हा पाण्यात गेला याची जबाबदारी पालिकेचे सक्षम व कार्यसम्राट नगराध्यक्षा घेणार का? असा सवाल करून जनतेला याचा जाब द्यावा लागेल, असा इशारा उपनगराध्यक्ष सुतार यांनी दिला. या वेळी नगरसेवक प्रकाश पाटील व रवींद्र कुंभारदरे हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT