winter sakal media
सातारा

सातारा : आगामी दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा

आगामी दोन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

सातारा : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला असून, आगामी दोन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्याचे किमान तापमान तीन अंशाने घसरणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पारा नऊ अंशावर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Satara Marathi News)

आज तसेच आगामी दोन दिवस उत्तर, पश्चिम, मध्यभारताच्या बहुतांशी भागामध्ये किमान तापमानात ३.५ अंशाने हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पारा घसरणार असल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दिवसभर जिल्ह्यातील तापमान कमी कमी होत होते. सायंकाळी नऊ अंशापर्यंत पारा खाली येणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

सध्याच्या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. आगामी दोन दिवस थंडीची लाट राहण्याचा अंदाज असून, तापमान आणखी खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. आज दिवसभर साताऱ्याचे तापमान कमाल २५, तर किमान नऊ अंश सेल्सिअस राहिले होते. रात्रीचे तापमान आणखी खाली येण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी राहणाऱ्या, तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT