karad 
सातारा

या गावात स्वातंत्र्यदिनाचा साक्षीदार अडगळीत

मुकुंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) ः येथील ऐतिहासिक झेंडा चौकातील पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा साक्षीदार असलेल्या झेंड्याचा चबुतरा वाचवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. येथील मुख्य बाजार चौकात पादचारी पथाजवळ सध्या अडचणीच्या जागेत व अतिक्रमणाच्या विळख्यात असणारा स्वातंत्र्याचा साक्षीदार स्मृतिस्तंभ शासनाने मध्यवर्ती ठिकाणी पुनर्स्थापित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

माजी उपपंतप्रधान व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस समिती व कामगार संघटनांनी हा राष्ट्रध्वजाचा चबुतरा 15 ऑगस्ट 1947 मध्ये उभारला. परिसरातील सुमारे 15 गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला होता. येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या (गुहागर- विजापूर) चौपदरीकरणाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढताना स्वातंत्र्याचा हा स्मृतिस्तंभ बाजूला केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले होते. लोकांच्या मागणीवरून बांधकाम विभागाने हा स्मृतिस्तंभाचा चबुतरा रस्त्याच्या एका बाजूस तात्पुरता उभारला आहे; पण तेथे व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने हा चबुतरा पुन्हा अडगळीत गेला आहे. 

ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या ध्वजस्तंभ लोकभावनेचा आदर करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यवर्ती ठिकाणी उभारावा, अशी मागणी हजारमाची ग्रामपंचायतीने तीन वर्षांपूर्वी उपअभियंत्यांकडे केली होती. ध्वजस्तंभाच्या बांधकामाचा खर्च करण्याची तयारीही या ग्रामपंचायतीने दर्शवली होती. गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT