Satara 
सातारा

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!

विलास खबाले

विंग (जि. सातारा) : वेळ सायंकाळी सहाची...शेतात खुरपणी करणारी एकटी महिला...अचानक बिबट्या तिच्या मागे येऊन दबा धरून बसला...तेही 15 सरींच्या अंतरावर...एवढ्यात लहान मुलांची नजर त्याच्याकडे जाते...मुलांचा आरडाओरडा होतो आणि बिबट्या तेथून पलायन करतो... क्षणाच्या अवधीत घडलेली चित्तथरारक सत्य घटना काल येथील चावर शिवारात घडली. 

येथून जवळच गावठाणाच्या पश्‍चिमेस चावर नावाचे शिवार आहे. तिच्याच शेतात एकटी महिला खुरपणी करत होती. काकी-काकी मागे बिबट्या अशी मोठ्याने हाक मुलांनी दिली. त्यानंतर आरडाओरडा सुरू केला. मात्र, महिलेने विश्वास न दाखवता मुलांकडे पहिल्यांदा दुर्लक्ष केले. त्यानंतर मात्र तिच्या धाकट्या जावेने हाक दिली. मग मात्र तिने मागे वळून पाहिले. काही अंतरावरच काळाप्रमाणे दबा धरून बसलेल्या बिबट्याकडे बघून अक्षरशः तिची भंबेरी उडाली. भीतीने त्या अक्षरशः घामाघूम झाल्या. त्यानंतर मात्र, त्यांची पळता भुई थोडी झाली. तातडीने त्यांनी जवळच्या वस्तीकडे धाव घेतली.

मुलांच्या आवाजाने व सावज टप्प्यात नसल्याचे पाहून बिबट्याने देखील लगतच्या उसाच्या शेतात पलायन केले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे समजून सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर मात्र त्या शिवारात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अनेक दिवसांपासून त्या चावर शिवारात बिबट्याचा वावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यास पाहिले आहे. वस्ती परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन घडले आहे. मादी अणि बछड्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. कालच्या घटनेवरून आणखी त्यात भर पडली. प्रत्यक्ष समोरच त्यास अनेकांनी पाहिले. घटना छोटी असली तरी भीती निर्माण करणारी आहे. गाव व परिसरात ती चर्चेचा विषय ठरली आहे. विंगसह परिसरात बिबट्याकडून अनेकदा यापूर्वी पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. 


""शेतात खुरपणी मी करत होते. काकी-काकी बिबट्या म्हणून मुलांनी हाक दिली. मात्र, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जाऊबाईनी हाक दिली. मग मी माझी नजर मागे वळवली. 15 सरींचे अंतरावर खरंच बिबट्या बघून मात्र माझी घाबरगुंडी उडाली. जीव मुठीत धरून तेथून मी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत त्याची भीती माझ्या मनात राहिली.'' 
-संगीता अशोक खबाले, 
शेतकरी महिला 
 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT