Satara 
सातारा

शामगाव तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे, कायदेशीर कारवाईची मागणी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शामगाव येथील तलाव शेतीसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो. 50 हून अधिक विहिरी रब्बीच्या पिकांच्या पाण्यासाठी या तलावावर अवलंबून असतात. तलावावरील बंधारा खचल्याने शेतजमिनींनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाने ताबडतोब त्याची दुरुस्ती करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्याला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास यांनी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी लघुपाटबंधारे उपविभागाचे अधिकारी अविनाश पद्‌माळे यांना दिले. 

निवेदनातील आशय असा : तलाव्यातील बंधारा अत्यल्प पावसाने खचलेला असून, ताबडतोब दुरुस्ती न झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. शामगाव दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. त्यासाठी शिवारात अनेक तलावांची निर्मिती शासनाने केली आहे. या तलावातील पाणी शेतकरी रब्बी हंगामाला देतात व यातून उपजीविका करतात. या तलावाचे पाणी मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना पुरेसे होते. सध्या क्रमांक दोनच्या तलावाला मजबुतीकरण करण्यात आलेला काही भाग खचलेला आहे, ते काम ठेकेदाराने गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी केले होते. मात्र, त्याबाबत लोकांतून साशंकता व्यक्त केली जात आहे.

शामगावच्या शेतीसाठी हा तलाव जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो. लघुपाटबंधारे विभागाने त्याची ताबडतोब दुरुस्ती करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्याला काळ्या यादीत समाविष्ट करावे. श्री. शिवदास यांच्यासमवेत शामगावचे बाळासाहेब पोळ, संजय कुंभार उपस्थित होते. यावेळी लघुपाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्री. पद्‌माळे यांनी लवकरात लवकर दुरुस्तीचे काम करू, असे आश्वासन 
दिल्याचे श्री. शिवदास यांनी सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT