karad 
सातारा

व्वा... "या' हॉस्पिटलमध्ये 392 कोरोना बाधितांवर मोफत उपचार

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) ः येथील कृष्णा हॉस्पिटलने एकही रुपया न घेता आतापर्यंत तब्बल 392 रुग्णांना योग्य उपचाराने कोरोनामुक्त केले आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यासाठी कृष्णा हॉस्पिटल देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देण्यासाठी व चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी कृष्णा हॉस्पिटलला राज्य सरकारने आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

येथील कृष्णा हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर श्री. पाटील यांच्या उपस्थितीत 15 कोरोनामुक्तांना घरी सोडण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून श्री. पाटील म्हणाले, ""कृष्णा हॉस्पिटलमधील रुग्णांचा आढावा अतुलबाबांकडून दर दोन दिवसांनी मी घेतो. कोरोनामुक्तीसाठी कृष्णा हॉस्पिटल करत असलेले प्रयत्न स्तुत्य असून, आता अशा हॉस्पिटलना आर्थिक सहकार्य करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढाकार घ्यायला हवा.'' 

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ""कृष्णा हॉस्पिटलमधून योग्य उपचाराने 392 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे सर्व उपचार मोफत करण्यात आले आहेत. हॉस्पिटलने स्वत:ची कोविड तपासणी प्रयोगशाळाही सुरू केली असून, त्या ठिकाणी दोन अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिल्याने दिवसाला 150 हून अधिक चाचण्या करणे शक्‍य झाले आहे.'' कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. सतीश पाटील, रोहिणी बाबर, कविता कापूरकर, संध्या जगदाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

समाजानेही काही भार उचलावा 
कऱ्हाडच्या विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या गैरसोयीबद्दलच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ""प्रशासनाने काही स्वयंसेवी संस्थांना या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. लक्षण नसलेल्या रुग्णांना व्यवस्था असेल तर घरी ठेवले जात आहे. मी पुण्यात संस्थांना, गणेश मंडळांनी परिसरातील लॉज, कार्यालयांत रुग्णांची सोय करून प्रशासनाचा भार कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. सरकारने व्यवस्था केली पाहिजे हे बरोबरच आहे. मात्र, समाजानेही आता काही भार उचलण्याची आवश्‍यकता आहे.'' 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT