karad 
सातारा

बापरे..! जंगलापेक्षा नागरी वस्तीत जास्त बिबटे?

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) ः जंगलातील बिबट्यापेक्षाही प्रादेशिक वन्यजीव विभागाच्या हद्दीत वावरणाऱ्या बिबिट्यांची संख्या जास्त आहे, असा दावा करणाऱ्या वन विभागाकडे प्रादेशिक क्षेत्रात फिरणाऱ्या बिबट्यांची मोजदाद करण्याची कोणतीही सामग्री नाही. पाच वर्षांच्या काळात तब्बल 12 बिबट्यांचा मृत्यू झाला. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांच्या जंगली भागात फिरणाऱ्या बिबट्यांची नोंद आहे. मात्र, प्रादेशिक क्षेत्रात फिरणाऱ्या बिबट्यांची नोंदच नाही. नैसर्गिक मृत्यू झालेल्या बिबट्यांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया, विषबाधा व भूकेने व्याकूळता अशी आहेत. 

नागरी वस्त्यांमध्ये बिबिट्यांचा वावर वाढतोय, पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत, मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग कुचकामी ठरत आहे. उसाचे वाढते क्षेत्र हेच बिबट्याचा नागरी वस्ती परिसरातील आदिवासाचे कारण ठरत आहे. त्यामुळे बिबट्याच्या अनुवंशिक सवयींवरही परिणाम झाला आहे, अशी तज्ज्ञांची मते आहेत. मात्र, त्याच्या सखोल अभ्यासाची गरज आहे. बिबट्याच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत आतापर्यंत 12 बिबट्यांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यातही दोन्ही तालुक्‍यात नऊ बिबट्यांला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. शिवारीतील बछडा, विहिरीत पडलेला बिबट्या अशा तब्बल नऊ बिबट्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात वन विभाग यशस्वी झाला आहे. कऱ्हाड तालुक्‍यात चार बिबटे व दोन बछडे, तर पाटण तालुक्‍यात तीन बिबटे वाचविले आहेत. 12 मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांपैकी सात बिबट्यांना नैसर्गिक मृत्यू आला आहे. तीन बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पाटणला एक बिबट्याची शिकार, तर एका बिबट्याला जीव संरक्षणासाठी गेला आहे. 

या सगळ्या नोंदी प्रादेशिक वन हद्दीतील आहे. त्या हालचाली जरी टिपल्या असल्या, तरी प्रादेशिक वन हद्दीत किती बिबटे आहेत, याची माहिती वन विभागाला सांगता येत नाही. त्यांची संख्या मोजण्याची कोणतीच सामग्री वन विभागाकडे नाही. प्रादेशिकच्या ठराविक भागातील बिबटे मोजता येतील, अशी भौगोलिक स्थितीही नाही. एक बिबट्या किमान 100 किलोमीटरच्या परिसरात आदिवास करतो, असे गृहीत धरले जाते. त्यामुळे त्याचा आदिवास व संख्या मोजणे कठीण आहे. 


या मुद्द्यांचा अभ्यास होण्याची गरज 
- बिबट्यासारख्या प्राण्याला उपाशी राहण्याची वेळ का येते? 
- बिबट्याला अन्नातून विष बाधा होते, त्याचे कारण काय 
- बिबट्याच्या नागरी वस्तीत वाढत्या संख्येबरोबरच अकाली मृत्यूचे आव्हान 
- जखमी बिबट्यावरही योग्य वेळी उपचारांची गरज 
- बिबट्याचा नागर वस्ती परिसरात वाढणारा आदिवासाची कारणे 
- बिबट्यांचा जंगलात राहण्याच्या अनुषंगिक सवयींमध्ये बदल झाला आहे का? 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT