karad 
सातारा

अरे व्वा... शेतकरी गटांनीच तपासली सोयाबीनची उगवण क्षमता

सकाळ वृत्तसेवा

मसूर (जि. सातारा) ः कृषी विभागाने शेतकऱ्यांकडील उपलब्ध सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी मोहीम एक ते 15 मे दरम्यान राबवण्यात आली. त्यात तालुक्‍यातील 366 शेतकरी गटांनी ही मोहीम राबवल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी दिली. 

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी बीजप्रक्रिया महत्त्व व फायदे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मसूर येथील संभाजी जगदाळे व किवळ येथे अमोल मुळीक यांच्याकडे सोयाबीनच्या 30 क्विंटल बियाण्यावर बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक केले. मसूर विकास सोसायटीचे (नंबर दोन) अध्यक्ष जालिंदर जगदाळे, "बायर' कंपनीचे अभिजित शिंदे उपस्थित होते. श्री. वेताळ म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे शेतकरी गटांमार्फत देण्यासह सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक राबवण्याची मोहीम हाती घेतली. गेल्यावर्षी अतिवृष्टीत सोयाबीन बियाण्याची राज्यभर कमतरता जाणवल्याने ही मोहीम राबवली.'' 

तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला म्हणाले, ""तालुक्‍यात सोयाबीन हे पीक प्रामुख्याने 12 हजार 105 हेक्‍टर क्षेत्रावर घेण्यात येते. गेल्या वर्षी कृषी विभागामार्फत घेतलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमातून दोन हजार 46 क्विंटल दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले. यंदा बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत बीजप्रक्रिया मोहीम राबवून मसूर येथील वसुंधरा शेती समूह गट व किवळ येथील कृषिधन शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील संबंधितांनी बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले.'' 


मंडल कृषी अधिकारी रवी सुरवसे, कृषी पर्यवेक्षक किसन वाघमोडे, कृषी सहायक संजय जाधव व कृषी सेवक प्रतीक्षा लिपारे यांनी कीटकनाशक व जैविक खताची सोयाबीन पिकास बीजप्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व सांगितले. कृषी पर्यवेक्षक वाघमोडे, कृषी सहायक जाधव, कृषी सेवक लिपारे, शेतकरी गटाचे अध्यक्ष जगदाळे व मुळीक यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे १०० टक्के अनुदानित शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांच्या जागेवर होणार समायोजन; आदेश नेमके काय? वाचा...

Indian girl in America: वडगावच्‍या नीलमची १४ महिन्यांची झुंज अखेर व्‍यर्थ; वडिलांचा हंबरडा...अपूर्ण राहिली भेट, अमेरिकेत नेमकं काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 08 एप्रिल 2026

Daily Panchang 8 April 2026 : शुभ मुहूर्त, राहू काळ आणि दिनविशेष जाणून घ्या

Beetroot Rajma Pinwheels: सकाळी नाश्त्याला बनवा प्रोटिनयुक्त अन् चवीला मस्त ‘बीटरूट राजमा पिनव्हील्स’, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT