phaltan 
सातारा

तुम्हीच सांगा... कसे करायचे ह्यांचे संगोपन

संजय जामदार

कोळकी ः झिरपवाडी (ता. फलटण) येथील श्री सद्‌गुरू यशवंतबाबा गोपालन संस्थेत चारा, पाण्याच्या कमतरतेमुळे गाईंचे संगोपन करण्यात अडचणीत येत असून राज्य शासनाने मदत करावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव कुंभार यांनी केले आहे. 

गेली अनेक वर्षे ही संस्था पूर्णपणे दानधर्मावर सुरू आहे. खिलार जातींच्या भाकड गाई, बैलांचा त्यात समावेश आहे. अवैधरित्या वाहतूक करताना तसेच कत्तलखान्याकडे जाताना पकडलेल्या गाई, बैल, छोटी वासरे, म्हशी या फलटणच्या शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याकडून या संस्थेत आणून सोडल्या जातात. अनेक शेतकरीही भाकड गाई येथे आणून सोडतात. हवे तेव्हा पुन्हा येथून गाई घेऊन जातात. 

पूर्वी ही गोपालन संस्था काही वर्ष विंचुर्णीत होती. त्यानंतर आता फलटण-सांगली मार्गावरील झिरपवाडी हद्दीतील खराडे पेट्रोल पंपाच्या दीड किलोमीटरमागे असणाऱ्या माळरानावर सुरू आहे. फलटण-बारामती येथील जैन समाजासह इतरही देणगीदारांकडून या गोपालन संस्थेस मदत होते. फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही प्रसंगी मदत करतात. सध्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे गाईंसाठी येणारी मदतही कमी झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून मदत मिळवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडून प्रयत्न झाला. मात्र, त्यास अजून यश प्राप्त झालेले नाही. 


या संस्थेत दोनशे छोटी-मोठी जनावरे आहेत. दहा ते 12 कर्मचारी काम करतात. त्यांचा पगार देणेसुद्धा संस्थेस परवडत नाही. त्यामुळे शासनाने मदत करून गोपालन संस्थेस नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी. 

- सदाशिव कुंभार, श्री सद्‌गुरू यशवंतबाबा गोपालन संस्था, झिरपवाडी 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT