Satara 
सातारा

युवक-युवतींनो, प्रबोधनासाठी पुढे या!, कोरोनाला आटोक्‍यात आणण्यासाठी आवाहन

दिलीपकुमार चिंचकर

सातारा (जि. सातारा) : कोरोना विषाणूला आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा परिषद विविध स्तरावर प्रयत्न करत असून, तळागाळातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम आणखी वेगाने आणि प्रभावीपणे होण्यासाठी सुशिक्षित नागरिक, जबाबदार तरुण-तरुणींनी प्रबोधनाला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले. 

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अधिकारी-कर्मचारी प्रतिबंधासाठी तसेच उपाययोजनांसाठी रात्रंदिवस झटत आहेत. परंतु, त्यासोबत जनप्रबोधन अत्यंत महत्त्वाचे आहे, ही बाब ओळखून अगदी गावपातळीपर्यंत प्रबोधनाचे प्रयत्न केले जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी स्तरांपर्यंत नागरिकांशी संपर्क असतो. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी प्रबोधन करत आहेत. अंगणवाडी सेविका, आशाताई लोकांपर्यंत घरोघरी पोचत आहेत. वारंवार हात धुणे, सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे ही यशाची त्रिसूत्री सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर ठसवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. 

प्रशासनाशी संबंधित सर्वच घटक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रबोधन करत आहेत. त्यांना नागरिकांनी साथ देण्याची गरज आहे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर नागरिकांनी प्रबोधनात्मक भूमिका घेतली आणि काळजी घेतली तर संकटावर मात करणे शक्‍य आहे. हे सर्व करताना प्रभावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. सुशिक्षित नागरिक, जबाबदार तरुण-तरुणींनी प्रबोधनाला हातभार लावावा, असे आवाहन श्री. भागवत यांनी केले आहे. 

""माहिती पत्रके, माहिती पुस्तके अशी प्रकाशने जिल्हा परिषदेमार्फत लाखोंच्या संख्येने छापली गेली आहेत आणि ती नागरिकांपर्यंत पोचवली जात आहेत. उत्साही युवक-युवती प्रबोधन चांगले करू शकतात. सर्वांच्या भल्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे.'' 

-संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा 

संपादन  : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT