Satara 
सातारा

मत व मनभेदाच्या भिंती तोडून वृक्षसंवर्धन, निसर्गाचे संतुलन

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : सामाजिक, राजकीय द्वेषापोटी गावोगावी मतभेदाच्या भिंती तयार झाल्या आहेत. या मत व मनभेदाच्या भिंती तोडून गावामध्ये एकीचे वातावरण निर्माण करण्याबरोबर परिसरात निसर्गाचे चांगले संतुलन राखण्याचा संकल्प डाळमोडी (ता. खटाव) येथील शेकडो युवकांनी केला आहे. 

दोन वर्षांपूर्वी डाळमोडीत किरण निकम, अजित माने आणि सचिन घाडगे या तरुणांनी राजकरण बाजूला ठेऊन गावातील तरुणांना एकत्र करून वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. मागील वर्षी व यावर्षी मिळून 110 झाडांचे रोपण आणि वृक्षसंवर्धनाच काम या तरुणांनी स्वखर्चातून सुरू केले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी गावातील आकाश पाटोळे व अमोल पाटील हे स्वतःचा टॅंकर व ट्रॅक्‍टर विनामूल्य देत आहेत. नोकरीनिमित्त बारामती येथे असणारे डॉ. एच. एस. पाटील, हरिदास चौधरी, संतोष माने हे तरुणांना वृक्षसंवर्धनासाठी लागेल ती मदत करत आहेत. आतापर्यंत या "टीम'ने 30 हजारांवर खर्च केला आहे. गावाच्या वनीकरणात या "टीम'ने मोठ्या होणाऱ्या वृक्षांच्या सुमारे तीन हजार बियांची लागवड केली आहे. 

दरम्यान, या उपक्रमात पूर्ण वर्षभर झाडांची निगा राखण्यासाठी अजित चौधरी, अक्षय चौधरी, भूषण घाडगे, गजानन निकम, प्रमोद पाटोळे, आकाश चौधरी, नानासाहेब चौधरी, रूपेश माने, सुभाष चौधरी, विठ्ठल चौधरी, श्रीकांत निकम, विशाल चौधरी, अनिकेत चौधरी, योगेश माने, सुशांत चौधरी, पवन चौधरी, सुशांत खोडसे, ओंकार चौधरी, भरत चौधरी, महेश पाटोळे, काकासाहेब पाटोळे, विशाल निकम, सौरभ घाडगे, सागर घाडगे, लक्ष्मण शिंदे, किरण निकम, सुमित निकम, आण्णा रायते, अर्जुन शिबे, सागर शिबे, शुभम चौधरी, तुषार माने, बबन देशमुख, गणेश चौधरी, निखिल निगडे, यशवंत जाधव, अक्षय शिबे यांचा सिंहाचा वाटा आहे. 

पहिला वर्धापन दिन साजरा 

दरम्यान, वृक्षरोपण उपक्रमाचा पहिला वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, माजी सरपंच विष्णुपंत निकम, राजेश निकम, बाबा शिंदे, धनंजय क्षीरसागर उपस्थित होते. 


संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक, विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT