सातारा

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काेराेनाबाधित, साताऱ्यातील कामकाज दाेन दिवस बंद

सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेतील अर्थ विभागासह सर्वच विभाग काळजीत पडले आहेत. दरम्यान आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) जिल्हा परिषदेचे संपुर्ण कामकाच बंद ठेवण्यात आले आहे. 

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या दरराेज सरासरी 75 पर्यंत वाढत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत पाेचला. प्रादुर्भाव थांबावा यासाठी सातारा जिल्हा 17 जूलैपासून लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. मिनी मंत्रालय म्हणून समजले जाणारे जिल्हा परिषद कार्यालयात काेराेनाचा शिरकाव झालेला आहे. काेराेना फायटरची भुमिका बजाविणारे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  

'या' सहकारी संस्थांना चिंता, 54 कोटी 40 लाख रुपये कसे परत मिळणार ?
 
पाच दिवसांपुर्वी शिरवळ येथील आलेल्या कोरानाबाधित रिपोर्टमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दोन्ही मुलांना कोराेना असल्याचा रिपोर्ट आला होता. त्यांचा लहान मुलगा आधी काेराेनाबाधित झाल्याचे समजले. त्यानंतर मोठा मुलगा बाधित झाला. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष हे काेराेनाबाधित झाल्याचे समजताच संपुर्ण शिरवळ शहरासह परिसरातील गावे, वाड्या वस्त्या काळजीत पडल्या. 

सोशल मिडियावर अनेकांनी दादा, लवकर बरे व्हा..अशी भावनिक साद घातली. त्यावर मी पुर्णतः चांगला आहे, काळजी नसावी असा संदेश पाठविण्यास प्रारंभ केला. दरम्यान दहा जुलैला खंडाळा पंचायत समिती सदस्य ही कोरानाबाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. यानंतर तालुक्यातील दुसरा पदाधिकारी कोरानाबाधित झाला आहे.

सातारा जिल्हा पाेलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी का चढविले पीपीई कीट. त्या काेणाला गेल्या भेटायला, काय म्हणाल्या सविस्तर वाचा 

दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्षांना काेराेनाची लागण झाल्याने सातारा जिल्हा परिषदेत आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) सॅनिटायझेशऩ करण्यात येणार आहे. त्यामुळे या दाेन दिवसांत अर्थ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वगळता काेणीही येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुरक्षितता म्हणून अर्थ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तपासणी करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.

काेराेनाबाधित रुग्णामागे दिवसाला इतके रुपये खर्च हाेताहेत, साताऱ्याला 13 कोटींची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore: भाजपला कमी लेखण्याची चूक विरोधकांना महागात: पालकमंत्री जयकुमार गोरे; जिल्हा परिषद, पंचायत समितीतील विजयाचे श्रेय जनतेला!

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी कर्ज उभारणीस मान्यता

H1B Visa Cancellation Bill : अमेरिकेत एच १ बी व्हिसा रद्द करण्यासाठी विधेयक सादर, भारतीयांवर होणार मोठा परिणाम

Pune Police combing operation : पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन! रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत धडक कारवाई

T20 World Cup: टीम इंडियाला धक्का! अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT