coronavirus Sakal Media
सातारा

सातारा : झेडपी’, पंचायत समितीतील २८१ जणांना कोरोनाची बाधा

गेल्या महिनाभरात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी मिळून २८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रशांत घाडगे -@ghadgepd

गेल्या महिनाभरात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी मिळून २८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

सातारा - गेल्या महिनाभरात जिल्हा परिषद, (ZP) पंचायत समितीचे (Panchyat Committee) अधिकारी, कर्मचारी मिळून २८१ जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. त्यामधील आतापर्यंत ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, २३६ कर्मचारी उपचार घेत आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सातारा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी हे मोठ्या संख्येने बाधित आले होते. विविध विभागांच्या ३० कर्मचाऱ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या लाटेत गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणात बाधित वाढले आहेत. १५ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत कऱ्हाड पंचायत समितीमधील ३६, कोरेगाव- १४, खटाव- १६, खंडाळा- २७, जावळी- ४, पाटण- ३९, फलटण- ३७, महाबळेश्वर- १२, माण- २१, वाई- ५० व सातारा पंचायत समितीचे २५ असे २८१ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेत अभ्यंगताना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत असून, नागरिकांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.

बाधितांची संख्या घटली

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात आणखी ९२१ कोरोनाबाधित आढळले असून, सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांचा संक्रमण दर २४ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT