Satara School News  Sakal
सातारा

Satara School News : शाळा प्रवेशाची लगबग, सीबीएसई, सेमी इंग्रजीकडे ओढा; साठ टक्के प्रक्रिया पूर्ण

साधारणतः जूनच्या सुरुवातीपर्यंत शाळा प्रवेशाची ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शाळा प्रवेशाची लगबग सुरू झाली असून, असंख्य पालक आपल्या पाल्यांसाठी अगदी चोखंदळपणे शाळा निवडताना दिसत आहेत. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील प्रवेशाची ६० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या अंतिम टप्प्यातील प्रवेश सुरू आहेत. साधारणतः जूनच्या सुरुवातीपर्यंत शाळा प्रवेशाची ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे.

शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशाची प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच सुरू होते, तर शहराच्या मध्यवर्ती भागात अनुदानित आणि मोजक्याच नामांकित खासगी शाळा असून, त्यात प्रवेश मिळावा, म्हणून पालक जानेवारीपासूनच प्रयत्न करू लागतात, तर शहराच्या उपनगरांमधील खासगी शाळांमधील प्रवेशाची प्रक्रिया मे-जूनपर्यंत सुरू राहते.

अद्ययावत आणि काळाशी सुसंगत अभ्यासक्रम, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नामांकित असा अभ्यासक्रम असणे, याशिवाय सीबीएसई आयसीएसई बोडांच्या अभ्यासात इंग्रजी, विज्ञान, गणितासह, शाळांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्यांना असणारे विशेष महत्त्व यामुळेही पालक या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते.

शाळांची संख्या

  • विद्यार्थी संख्या : ४ लाख १० हजार

  • खासगी विनाअनुदानित शाळा : ३२

  • अनुदानित शाळा : ६१४

  • जिल्हा परिषद शाळा : २,६८२

  • नगरपालिका शाळा : ५२

  • महागड्या शाळांकडे

पालक का वळतात?

  • विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये शिक्षण मिळावे.

  • सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या आधुनिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे.

  • डिजिटल क्लासरूम, प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षण.

  • शिक्षणाबरोबर अन्य कौशल्य शिकण्याला महत्त्व.

शाळा प्रवेशातील सध्याचा कल

  • सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा कल.

  • सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक.

  • अनुदानित शाळांमधील शुल्क कमी असले तरी महागड्या खासगी शाळांकडे ओढा.

  • भविष्यात परदेशात जाण्याची संधी मिळेल म्हणून मोठ्या शहरात आयबी, आयसीएसई शाळा तर लहान शहरांमध्ये सीबीएसई माध्यम

माझ्या मुलाला सेमी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहे. जेणेकरून मातृभाषेच्या अभ्यासही उत्तम होईल व जागतिक भाषा असणाऱ्या इग्रजींमध्येही तो कमी पडणार नाही. अनेकदा विद्यार्थ्यांना मातृभाषाच येत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषा आल्यास सर्व भाषांमध्ये अभ्यास सोपा जाईल.

- पालक

सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमाची शाळा काळाची गरज आहे. या भाषेतून शिक्षण घेतल्याचा उपयोग विद्यार्थ्यांना दहावीनंतर होतो, तसेच इतर शाळांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांची फी अधिक असली तरी शैक्षणिक सुविधा चांगल्या असतात.

- पालक

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा चांगल्या दिल्या जातात. शासनाने आता मॉडेल स्कूल ही संकल्पना राबविली असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम, सुसज्ज प्रयोगशाळा यासह दर्जेदार भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे.

- शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT