सातारा

तब्बल 7 महिन्यांनंतर आज शाळेची घंटा वाजणार!

सकाळवृत्तसेवा

शिरवडे (जि. सातारा) : कोरोना संसर्गातील जमावबंदी आदेशानंतर शासनाकडून प्रत्यक्ष शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. फक्त नववी व दहावीचे वर्ग सुरू होत असून, सात महिने शुकशुकाट असणाऱ्या शाळांत आज सोमवार पुन्हा विद्यार्थी दिसतील.

पालकांनी विद्यार्थ्यांना आणणे-नेणे यासह शिक्षणांसाठी संमतीपत्र द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत सक्ती नाही. प्रवेश देताना सॅनिटायझर, तापमान तपासणी होईल. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र बाकावर बसविले जातील. एकमेकांत सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मास्क आवश्‍यक आहे. शैक्षणिक साहित्याचा एकमेकांत वापर करता येणार नाही. एकूण चार तासिका घेण्यात येतील. 

विद्यार्थ्यांचे व्हॉटसऍप ग्रुप केले आहेत. पालकही सूचना करू शकतात, असे शालेय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. बऱ्याच कालावधीनंतर शाळा सुरू होत आहेत; परंतु कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अभ्यासक्रम शिकवताना जे यंदा समजले नाही ते पुढील वर्गात गेल्यावरही शिकवण्यात यावे, अशी सूचना परशुराम जाधव यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT