सातारा

पोलिसांचा तुम्हाला काही त्रास? गृहराज्यमंत्र्यांचा साताऱ्यात सवाल

उमेश बांबरे

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत पायी फिरून व्यापारी व किरकोळ व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तुम्हाला पोलिसांचा काही त्रास आहे का, पोलिस तुम्हाला हप्ता मागतात का, असेही त्यांनी व्यावसायिकांना विचारले. त्यावर सर्वांनी केवळ नाही म्हटल्यावर पोलिस समोर आहेत म्हणून नाही सांगू नका, असा धीरही त्यांनी दिला.
'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा 
 
गृहराज्यमंत्री देसाई यांनी रविवारी सायंकाळी शहरातील मोती चौक ते जुना मोटार स्टॅण्ड चौक असे चालत जाऊन या ठिकाणच्या छोट्या व्यावसायिक व दुकानदारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार तसेच पोलिस उपस्थित होते. चक्क गृहराज्यमंत्री बाजारपेठेत पायी फिरत असल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटले. त्यांच्यामागे गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी वाहने थांबवून ठेवली. त्यावर लगेचच श्री. देसाई यांनी पोलिसांना ट्रॅफिक अडवू नका, ट्रॅफिक सोडा, असे सांगितले. या वेळी त्यांनी पेढ्याचे व्यावसायिक, गजरेवाला तसेच राखी विक्रेते, रस्त्याच्या कडेने बसलेले विक्रेते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

पाटणमध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती; बळीराजा हवालदिल

बकरी ईदला रक्तदान; मुस्लीम समाजाने दिला अनोखा संदेश
 
श्री. देसाई म्हणाले,"" जिल्ह्यात एक तारखेपासून लॉकडाउन अंशतः शिथिल केले आहे. रक्षाबंधन सणाच्या तोंडावर लॉकडाउन शिथिल झाल्याने बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण किती आहे, याची माहिती घेण्यासाठी मी बाजारपेठेत फिरत आहे. सध्या महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या लॉकडाउनमुळे छोट्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच आर्थिक व्यवहार मंद गतीने चालले आहेत. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी लाकउाडन शिथिल केल्याने दुकाने सुरू झाल्याने गर्दी सुरू झाली आहे. हळूहळू अर्थव्यवस्थेचा गाढा रूळावर येत आहे.'' लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही पोलिस व महसूल प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. व्यवसाय सुरू झाल्याने उलाढाल वाढणार आहे. पण, लोकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये. स्वंयशिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोठी कारवाई! ४ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

Mumbai News: मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' मार्गावर प्रवेशबंदी, 'असे' असतील पर्यायी मार्ग

मित्राची बहीण म्हणून आधी काही बोललो नाही पण... प्रसाद जवादेने सांगितली त्यांची लव्हस्टोरी; म्हणाला, 'मी तिला किती वेळा विचारलं'

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी’साठी मिळाली स्थगिती; लाभार्थी महिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास, सरकारचे महिलांकडून आभार

Latest Marathi News Live Update : पुणे दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई, एक जणाला अटक

SCROLL FOR NEXT