Water Supply esakal
सातारा

Water Supply : ‘शहापूर’चा पाणीपुरवठा आज, उद्या बंद

शहापूर योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या शेंद्रे सबस्‍टेशन येथे बिघाड झाल्‍याने त्‍याठिकाणचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा - शहापूर योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या शेंद्रे सबस्‍टेशन येथे बिघाड झाल्‍याने त्‍याठिकाणचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहापूर योजनेवरील भागातील सकाळ आणि दुपारच्‍या सत्रातील पाणीपुरवठा उद्या (मंगळवार) व बुधवारी (ता. तीन) असे दोन दिवस बंद राहणार आहे.

वीजवाहिनीत झालेला बिघाड दूर करण्‍याचे काम वीज वितरणच्‍या माध्‍यमातून उद्या (मंगळवार) हाती घेण्‍यात येणार आहे. यामुळे शहापूर योजनेचा वीजपुरवठा बंद राहणार असल्‍याने त्‍याठिकणचा पाणीउपसा बंद राहणार आहे. दुरुस्‍तीच्‍या कामासाठी आठ तास लागणार असल्‍याने यशवंत गार्डन टाकीत अपेक्षित पाणीसाठवण होऊ शकणार नाही. यामुळे या टाकीवरील भागातील दुपारच्‍या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बुधवारी (ता. तीन) सकाळच्‍या सत्रात शहापूर योजनेवरील गुरुवार, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकी, या टाक्‍यांमध्‍ये अपेक्षित पाणीसाठा होण्‍यात अडचणी येणार आहेत. यामुळे या टाक्‍यांवर आधारित भागात सकाळच्‍या सत्रात कमी दाबाने अथवा न होण्‍याची शक्‍यता आहे.

शहापूर योजनेवरील शहरातील भागातील नागरिकांनी उपलब्‍ध पाण्‍याचा काटकसरीने वापर करावा.

- अभिजित बापट, मुख्‍याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

SCROLL FOR NEXT