राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन  sakal
सातारा

राजर्षी शाहू महाराजांसाठी कऱ्हाडकर झाले १०० सेकंद स्तब्ध

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड: पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ठिक १० वाजता येथील शाहु चौकाचा परिसर १०० सेकंद स्तब्ध झाला. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहली.

कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारच्यावतीने हे वर्ष ‘कृतज्ञतापर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाने आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी येथील शाहु चौकातील पुतळ्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.

त्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, उपनिबंधक,वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंराव जगदाळे, कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, आदरणीय यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव भोजगांवकर, जयंत बेडेकर, प्रशांत यादव, प्रमोद पाटील, राकेश शहा, गंगाधर जाधव, गोविंदराव थोरात, सतीश भोंगाळे, नवाज सुतार, अमोल सूर्यवंशी, वैभव हिंगमिरे, सर्जेराव पाटील, सचिन चव्हाण, निखिल शिंदे, भारत थोरवडे, मंगेश वास्के, तारळेकर आदींसह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update : भरधाव कारने ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT