सातारा

खंडणी उकळणाऱ्या महिलांच्या आवाजाचे नमुने पुण्यात तपासणीला

उमेश बांबरे

सातारा : समाजमाध्यमातून अश्‍लिल व्हिडिओ प्रसिध्द करण्याची धमकी देऊन डॉक्‍टरकडून खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांनी डॉक्‍टरांशी मोबाईलवरून केलेले संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड करून घेतले आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तातडीने पाठविण्यात येणार आहेत. साताऱ्यातील अनेकांना या महिलांनी जाळ्यात ओढल्याचे तपासात उघड झाले आहे. पण, तक्रार करण्यास आजपर्यंत कोणीही पुढे आलेले नाही, त्यामुळे पोलिसांची अडचण झाली आहे. 
 
प्राची ऊर्फ श्रद्धा अनिल गायकवाड (वय 35), पूनम संजय पाटील (वय 35, मूळ रा. गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे, सध्या रा. सोमवार पेठ, सातारा) या दोन महिलांनी समाजमाध्यमातून अश्‍लिल व्हिडिओ पसरविण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनी संबंधित डॉक्‍टरकडून तब्बल 12 लाख उकळले होते. अश्‍लिल व्हिडिओ आणि गैरकृत्याचे स्क्रीन शॉट असल्याचे दाखवून या महिलांनी डॉक्‍टरकडे खंडणी मागितली होती. पोलिसांच्या तपासात या महिलांकडे केवळ स्क्रीन शॉट आढळून आले आहेत. व्हिडिओ अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून नवी नियमावली जाहीर; 31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू

या महिलांनी डॉक्‍टरांशी मोबाईलवरून केलेले संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड करून घेतले आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. साताऱ्यातील अनेक जण या महिलांच्या जाळ्यात अडकले असल्याचे तपासात समोर येत आहे. मात्र, आम्हाला तक्रारच द्यायची नाही, अशी भूमिका या सर्वांनी घेतल्याने पोलिस हतबल झाले आहेत.

फलटण तालुक्यातील अपहरण झालेले दहा महिन्यांचे बाळ सापडले विहिरीत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT