Shambhuraj Desai esakal
सातारा

'102 मतांवरून तीन लाख मतांचा अंदाज बांधणं हास्यास्पद : शंभूराज देसाई

राजेश पाटील

'बँकेच्या 102 मतांवरून तालुक्यातील तीन लाख मतांचा अंदाज बांधणं हास्यास्पद आहे.'

ढेबेवाडी (सातारा) : जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) १०२ मतांवरून तालुक्यातील तीन लाख मतांचा अंदाज बांधणे हास्यास्पद असून दूर कशाला, आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad Election) व पंचायत निवडणुकीतच विरोधकांना ट्रेलर दाखवू, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी लगावला.

निसरे-मारुल हवेली-गुढे-काळगाव रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन मंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कुठरे येथील सभेत ते बोलत होते. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, बबनराव पाटील, बांधकाम व्यावसायिक महेश पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर नलवडे उपस्थित होते. देसाई म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांच्या विकासाशी असलेली माझी बांधिलकी आणि जोडलेली नाळ मी कधीही तुटून देणार नाही. पाटण तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील विकासाचे रोलमॉडेल बनवायचे आहे.

Shambhuraj Desai

तालुक्यातील अनेक रस्त्यांनी कधी डांबर पाहिलेलेही नव्हते. तेही रस्ते चकचकीत केलेले असून एकाच टप्प्यात ५१ नळ योजना मंजूर करून आणल्या आहेत. विकासकाम देताना मी मताचे राजकारण कधी केले नाही आणि करणारही नाही. विकासाच्या पाठीशीच सामान्य माणूस उभा राहतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.’’ माजी उपसरपंच तानाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. सुनील पवार यांनी सूत्रसंचालन केले. महेश पाटील यांच्यासह कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल संदीप सुतार तसेच सायली कोळेकर, गिर्यारोहक संदीप भिंगारदेवे आदींचा मंत्री देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT