Satara Lok Sabha Result Shashikant Shinde defeat  Satara Lok Sabha Result Shashikant Shinde defeat
सातारा

Satara Lok Sabha Result: तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात...साताऱ्यात नेमकं काय घडलं?

Shashikant Shinde defeat Satara Lok Sabha Result 2024 : सातारामध्ये संजय कोंडीबा गाडे यांच्या ट्रम्पेट या तुतारी सारख्या चिन्हाने ३५ हजार ३११ मते घेतली. त्यामुळे निकाल बदलला.

Sandip Kapde

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. फक्त ३२ हजार ७७१ मतांनी शिंदेच पराभव झाला. भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना ५ लाख ७१ हजार १३४ मते मिळाली. तर शशिकांत शिंदेंना ५ लाख ३८ हजार ३६३ मते मिळाली. तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा घात केला नाहीतर शिंदेंचा विजय नक्की होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सातारामध्ये संजय कोंडीबा गाडे यांच्या ट्रम्पेट या तुतारी सारख्या चिन्हाने ३७ हजार ०६२ मते घेतली. त्यामुळे निकाल बदलला. कराड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाने उदयनराजे भोसले यांना भरभरून मतदान केले. मात्र जर संजय कोंडीबा गाडे यांचे चिन्ह जर वेगळे असते निकाल काही वेगळी असता.

सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. ६३ टक्के मतदान या मतदारसंघात झाले होते.

सर्वात कमी मतदान २००९ च्या निवडणुकीत ५२.८ टक्के झाले होते, तर १९९९ च्या निवडणुकीत ७१.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६०.४७, तर आता ६३ टक्क्यांवर मतदान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT