satara political newa 
सातारा

आमची निष्ठा पैशाने विकली जात नाही, आम्ही पवारनिष्ठ!; राष्ट्रवादीच्या आमदाराचा महेश शिंदेंवर पलटवार

मागील अनेक वर्षांपासून माझ्या पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न झालेत, मी कायम शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलोय

सकाळ डिजिटल टीम

मागील अनेक वर्षांपासून माझ्या पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न झालेत, मी कायम शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलोय

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश करत असतील, तर त्यांचे मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण, त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते याची उपरती झाली असेल, असे मत आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी व्यक्त केले होते. दरम्यान, आता यावर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यांसदर्भात ट्वीट करत त्यांनी महेश शिंदेंच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, आमची निष्ठा पैशाने विकली जात नाही, आम्ही पवारनिष्ठ आहोत. आमची निष्ठा नेत्यांच्या विश्वासावर आणि प्रेमावर टिकून आहे. ज्यांची लोकप्रियता ढासळू लागली आहे आणि ज्यांना गद्दार म्हणून हिनवले जात आहे, अशांनी माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश येणार नाही.

मी शरद पवारांमुळेच घडलो आहे आणि कायम त्यांच्यासोबतच राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पक्ष प्रवेशासाठी काही लोकांनी प्रयत्न केला असतानाही मी कायम शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आहे, आणि हे सर्वांना ठाऊक आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

साताऱ्यातील एका पत्रकार परिषदेत महेश शिंदे यांना शशिकांत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काय? चर्चा आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मला आनंद होईल; पण खर तर हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीमधील आहे. तसे म्हटले तर आज अनेक जण पक्ष प्रवेशासाठी रांगेमध्ये आहेत; पण तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो. आज खळ उठले आहे, वस्ती उठायला वेळ नाही लागणार, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT