Satara Municipal Election
Satara Municipal Election esakal
सातारा

Satara : दोन्ही राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा बसणार? राष्ट्रवादीच्या आमदारानं ठोकला शड्डू

उमेश बांबरे

गेली अनेक वर्षे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यात संघर्ष होत राहिला आहे.

सातारा : सातारा नगरपालिकेच्‍या निवडणूक (Satara Municipal Election) रिंगणात सातारा शहर महाविकास आघाडी (Satara City Mahavikas Aghadi) उतरविण्‍याचा निर्णय आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्‍या उपस्‍थितीत झालेल्‍या बैठकीत आज घेण्‍यात आला. या महाविकास आघाडीमुळं आगामी निवडणुकीत सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीला तगडा पर्याय उभा राहण्याची शक्‍यता निर्माण झालीय.

सातारा शहराच्‍या आणि पालिकेच्‍या राजकारणात गेली अनेक वर्षे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्‍यात संघर्ष होत राहिला आहे. त्‍यातच या दोन्‍ही आघाड्यांच्‍या पारंपरिक सत्ता संघर्षाला भेदण्‍याचा प्रत्यय अनेक पातळीवर अनेकांनी केला. मात्र, त्‍याला फारसं यश आलं नाही. राष्‍ट्रवादीत असणारे दोन्‍ही नेते भाजपमध्‍ये गेल्‍याने या ठिकाणी राष्‍ट्रवादीचे नेतृत्‍व उभे करण्‍यासाठीची संधी तयार झाली. ती संधी साधत आगामी पालिका निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे हे सक्रिय होतील, अशी चर्चा गेली अनेक महिने शहरात सुरू होती.

या चर्चेला बळकटी देणारी बैठक आज त्‍यांच्‍याच उपस्‍थितीत पार पडली. या बैठकीसाठी राज्‍यातील महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी, तसेच माजी उपाध्‍यक्ष ॲड. बाळासाहेब बाबर, शहर सुधार समितीचे अस्‍लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, अमर गायकवाड, गिरीश मोडकर, स्‍नेहा अंजलकर, सलीम कच्‍छी, अमित कदम, अमृता पाटील, रावण गायकवाड, मोहनीस शेख, राहुल यादव, नंदकुमार कवारे व इतर नागरिक उपस्‍थित होते.

पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देण्‍याचा संकल्‍प

या बैठकीत सातारा शहराच्‍या विकासाच्‍या अनुषंगाने चर्चा झाल्‍यानंतर सातारा शहर महाविकास आघाडी निर्माण करण्‍यावर उपस्‍थितांनी सहमती दर्शवली. त्यानुसार आगामी काळात पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला. निवडणुकीच्या तोंडावर या महाविकास आघाडीची घोषणा झाल्‍याने आगामी काळात त्‍याचे साताऱ्याच्‍या राजकारणात काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT