सातारा

हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज (साेमवार, ता. 18) होणार असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या जिल्ह्यातील नऊ हजार 521 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी आठपासून टपाली मतदानाची मोजणी होईल. पहिला निकाल नऊ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

या निवडणुकीच्या निकालानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित गावांमध्ये विजयी मिरवणूक, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, विनापरवानगी फ्लेक्‍स, बॅनर लावण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे.

त्याचबरोबर साेमवार (ता. 18) रात्री दहा वाजल्यापासून मंगळवार (ता. 19) पहाटे सहा वाजेपर्यंत निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पानटपरी आदी व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह दिले आहेत. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत.

महाबळेश्‍वरात पहिल्यांदाच दिसले पांढऱ्या रंगाचे शेकरू

वडूज : मतदान अधिकाऱ्यास मारहाण; शिक्षक संघटना संतप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT