सातारा

अखेर खासगी डॉक्टरांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना काढावा लागला आदेश

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टर मात्र लक्षणं असूनही इतर उपचार करतात पर्यायाने रुग्णाचा संसर्ग वाढतो आणि रुग्णास धोका पोहचतो असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे खासगी डॉक्टरांनी कोविड उपचार करावेत अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. रुग्णांमध्ये कोविड लक्षणे दिसत असल्यास अशा रुग्णांना खासगी डॉक्टरांनी प्रथम कोरोना टेस्ट करण्याबाबत सक्तीने सांगावे त्यांनतरच योग्य ते उपचार करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांकडे कोरोनाच लक्षणे असणारा रुग्ण आल्यास त्याच्यावर कोविड प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत अथवा शासकीय रुग्णालयाकडे पाठवावे. असे न केल्यास जिल्हा प्रशासनाकडून अशा खासगी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जिल्ह्यात तसे गुन्हे नोंदविले आहेत असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत सांगितले आहे.

वेण्णा नदीपात्रात बांधकाम; महाबळेश्‍वरातील दोघांवर गुन्हा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT