सातारा

नाे एन्ट्री...अन्यथा तुम्हांला 'या' गावात श्री शंभू महादेवाचे दर्शन पडेल हजार रुपयांना

धनाजी कावडे

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) :  श्रावण महिन्यात येथील महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना संसर्गापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत व कोरोना समिती, पोलिस प्रशासन बाहेरून गावाहून येणाऱ्या भाविकांना एक हजार रुपये कर स्वरुपात दंड आकारणार आहे.
अखेर 'त्या' विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा 

त्यासाठी गावात तीन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले असून, पोलिस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात बाहेरील व्यक्तींना गावात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

श्री शंभू महादेवाची श्रावण महिन्यात अभिषेक देवदर्शनासाठी लोक गर्दी करू पाहात आहेत. नैमित्तक देवपूजेशिवाय अद्याप मंदिर बंदच आहेत. पर्यटन, देवदर्शनासह सर्व व्यवहार शिंगणापूरमध्ये बंद आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत, दक्षता समिती आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी कठोर कारवाईचे आदेश शिंगणापूर पोलिस दूरक्षेत्रास दिले आहेत. त्यामुळे आरोग्याचे नियम न पाळणाऱ्याबरोबरच शिंगणापूरमध्ये एन्ट्री करणाऱ्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. 
संपादन - संजय शिंदे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT